शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकास योजनेंतर्गत ४0६ विद्यार्थिनींना मिळणार सायकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 13:22 IST

अकोला: मानव विकास मिशन अंतर्गत पातूर तालुक्यातील ३२ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना मोफत सायकल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ लाख २१ हजार रुपयांचे अनुदान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन विभागाने मंजूर केले.

अकोला: मानव विकास मिशन अंतर्गत पातूर तालुक्यातील ३२ शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना मोफत सायकल देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ लाख २१ हजार रुपयांचे अनुदान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन विभागाने मंजूर केले. ४0६ विद्यार्थिनींना सायकली देण्यात येणार आहे. त्यासाठी आरटीजीएसनुसार मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या तालुक्यांसाठी मानव विकास योजना कार्यक्रम राबविण्यात येतो. अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील ३२ शाळांची योजनेसाठी निवड झाली आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. २0१८ व १९ या वर्षासाठी शासनाकडून पातूर तालुक्यातील इयत्ता आठवी ते बारावीत शिकणाऱ्या ४९६ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि घरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या शाळेमध्ये जाता यावे, यासाठी मोफत सायकली उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. त्यासाठी प्रशासनाने माध्यमिक शिक्षण विभागाला १४ लाख रुपयांचा निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. नियोजन विभागाने ४0६ सायकलींसाठीचे अनुदान माध्यमिक शिक्षण विभागाकडे दिले असून, हे अनुदान आरटीजीएसनुसार मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांनी प्रत्येकी ३,५00 रुपयांच्या किमतीची सायकल खरेदी करून विद्यार्थिनींना उपलब्ध करून द्यायच्या आहेत. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांच्या मार्गदर्शनात हे अनुदान शाळांना वितरित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी