शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना मिळणार ४00 कोटी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:53 IST

अकोला : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, बाधित कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत शुक्रवारी मदत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ३0 हजार १२६ हेक्टरवरील कपाशीच्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाईपोटी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे.

ठळक मुद्देबोंडअळीचा प्रादुर्भाव १ लाख १0 हजार हेक्टरवरील कपाशी नुकसानाचे पंचनामे पूर्ण!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, बाधित कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत शुक्रवारी मदत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ३0 हजार १२६ हेक्टरवरील कपाशीच्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाईपोटी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे. मदतीचा हा आकडा हा ४00 कोटींपेक्षा जास्त असेल. राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकर्‍यांसाठी कृषिमंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांनी २२ डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात विधानसभेत मदत जाहीर केली. त्यामध्ये कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी ‘एनडीआरएफ’ मार्फत ६ हजार ८00 रुपये, पीक विमा ८ हजार रुपये व कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत कंपन्यांकडून मिळणारी १४ हजार रुपयांची मदत, अशी एकूण ३0 हजार ८00 रुपये प्रतिहेक्टर मदत बाधित कापूस उत्पादक शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे.  तसेच बागायत कापूस उत्पादक शेतकर्‍यांना ३७ हजार ५00 रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे दोन हेक्टर र्मयादेपर्यंत मदत देणार आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्ह्यात १ लाख ३0 हजार १२६ हेक्टरवरील कपाशीच्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकर्‍यांना मदतीचा लाभ मिळणार आहे.

४00 कोटी ४0 लाखांच्यावर मदत!बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या बाधित कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ३0 हजार १२६ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पीक नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकर्‍यांना मदत वाटपासाठी ४00 कोटी ४0 लाखांपेक्षा अधिक मदत शासनाकडून मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरcottonकापूसFarmerशेतकरी