शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

एकाच दिवशी ३८५ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:23 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,६३७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,६३७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ३४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,२९७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील ४९, एमआयडीसी व मूर्तिजापूर येथील १४, डाबकी रोड येथील ११, जीएमसी येथील १०, केशवनगर व सुकली येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड व कौलखेड येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी व पोपटखेड येथील प्रत्येकी पाच, देवळी, रामदासपेठ व गणेशनगर येथील प्रत्येकी चार, सोपीनाथनगर, दुर्गा चौक, गड्डम प्लॉट, सिंधी कॅम्प, रजपूतपुरा, महाकाली नगर, बाळापूर रोड, अंबुजा, व्हीएचबी कॉलनी व गायगाव येथील प्रत्येकी तीन, गोरेगाव खु., तेल्हारा, बलवंत कॉलनी, राऊतवाडी, शिवाजीनगर, उन्नतीनगर, खोलेश्वर, गंगानगर, खडकी व रिधोरा येथील प्रत्येकी दोन, पास्टूल, कान्हेरी सरप, शिवाजी प्लॉट, इनकम टॅक्स, कलेक्टर ऑफिस, कपीलवास्तूनगर, कलाल चाळ, बार्शीटाकळी, पुनोती ता. बार्शीटाकळी, कारला ता.तेल्हारा, शिवसेना वसाहत, गीतानगर, देशमुख फैल, हिवरखेड, खोलेश्वर, गौरी अपार्टमेंट, सहकारनगर, गौरवनगर, जैन चौक, कीर्तीनगर, उद्याननगर, कृषिनगर, बलोदे लेआउट, गोडबोले प्लॉट, जुने शहर, गवलीपुरा, बाळापूर नाका, शास्त्रीनगर, नयागाव, बिर्ला गेट, नांदखेड टाकळी, यात्रा रोड चौक, भातवाडी बु., चिचोली, म्हातोडी व गोरेगाव येथील प्रत्येकी एक अशा २३४ रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १०६ जणांमध्ये मूर्तिजापूर येथील १२, डाबकी रोड येथील सात, सिरसो येथील सहा, हिरपूर, बाळापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, भौरद, कौलखेड व मलकापूर येथील प्रत्येकी चार, न्यू राधाकिसन प्लॉट, जयहिंद चौक, दहिहांडा, व वानखडे नगर येथील प्रत्येकी तीन, विधुनगर, आदर्श कॉलनी, कीर्तीनगर, तापडीयानगर, रामनगर, गोरक्षण रोड, आश्रम नगर, मालीपुरा व खोलेश्वर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बोर्टा, कोरडे हॉस्पिटल, अकोट, दीपक चौक, उमरी, शास्त्रीनगर, गजानन पेठ, जुने शहर, गुडधी, रणपिसेनगर, खडकी, बालाजी नगर, अमाखाँ प्लॉट, गोडबोले प्लॉट, विजयनगर, देशमुख फैल, तिलक रोड, शासकीय वसाहत, रजपूतपुरा, अमप्रीत कॉलनी, गंगानगर, गड्डम प्लॉट, सुधीर कॉलनी व गुलजार पुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्ण आहेत.

वाशिंबा व माना येथील पुरुषांचा मृत्यू

बुधवारी अकोला तालुक्यातील वाशिंबा येथील ५८ वर्षीय पुरुष व मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील ७३ वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरमयान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे १३ व २३ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

१०६ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून सहा, हॉटेल स्कायलार्क येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून चार, अवघाते हॉस्पिटल येथून चार, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले ६२ अशा एकूण १०६ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.

२,६६३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४,८०३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,७८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,६३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १२,१८८ २,४३८ १७७= १४,८०३

मयत- ३५९

डिस्चार्ज- ११,७८१

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)- २,६६३