शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तीजापूर तालुक्यात ३७ शाळांच्या इमारती शिकस्त; मुंगशी येथे शाळेचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:34 IST

मुंगशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीचे छत १४ आॅगस्ट रोजी रात्री कोसळल्याची घटना घडली.

- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : शासन शैक्षणिक कार्यावर भर देत असताना विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत, तर नवीन बांधण्यात आलेल्या इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तालुक्यातील ३७ शाळांच्या इमारती शिकस्त झाल्या असून, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील मुंगशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीचे छत १४ आॅगस्ट रोजी रात्री कोसळल्याची घटना घडली.तालुक्यात १४२ शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यापैकी ३७ शाळांतील ६७ खोल्या शिकस्त झाल्या असल्याने त्या जमीनदोस्त करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे; परंतु या खोल्यांना जमीनदोस्त करण्याची परवानगी मिळाली नाही. यापूर्वी १७ शाळांमधील ३२ खोल्यांच्या अंदाजपत्रकासाठी उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद यांच्याकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. मुंगशी येथील जिल्हा परिषद शाळेची दोन खोल्यांची जुनी इमारत असून, अनेक वर्षांपासून शिकस्त झाली होती. या इमारतीचे छत १४ आॅगस्टच्या रात्री कोसळले. शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग भरतात. शाळेची पटसंख्या ५५ असून, सध्या कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. शाळा इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मुख्याध्यापक मनीष कट्यारमल यांनी दिली. याच शाळेपासून काही अंतरावर २०१० मध्ये २ लक्ष ७० रुपये व २०१४ मध्ये १० लक्ष २६ हजार खर्च करून नवीन शाळा इमारत उभारण्यात आली असून, या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या इमारतीला मोठे तडे गेले आहेत. तालुक्यातील ३७ शाळांमधील विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षण घेण्यासाठी इमारतच नसल्याने त्यांच्या शैक्षणिक मूलभूत सुविधा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरSchoolशाळा