शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरचे बियाणे वापरल्याने शेतकऱ्यांचे वाचले ३७ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 10:13 IST

जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर घरचे बियाणे पेरल्याने शेतकºयांची तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरलेले बियाणे न उगवल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले; मात्र त्याच सोबत असेही काही शेतकरी आहेत ज्यांनी कंपन्यांचे नाही, तर घरचे बियाणे पेरले आहेत. जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर घरचे बियाणे पेरल्याने शेतकºयांची तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे.यावर्षी मान्सून वेळेवर आल्याने बहुतांश शेतकºयांनी पहिल्याच पावसात पेरण्या आटपून घेतल्या; मात्र पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकºयांवर मोठे संकट ओढवले. शेतकºयांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून बियाणे कंपन्यांसह बियाणे विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करत आहेत. जिल्ह्यात शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले, तरी जिल्ह्यातील असेही काही शेतकरी आहेत ज्यांची मोठी बचत झाली आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख १० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापैकी ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले आहेत. इतर कंपन्यांचे बियाणे उगवले नसले, तरी ज्या शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले त्यांचे नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ६० हजार हेक्टरवर घरचे बियाणे पेरलेल्या शेतकºयांचे तब्बल ३७.५ कोटी रुपये वाचल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.बहुतांश तक्रारी मध्य प्रदेशातील बियाण्यांविरोधात!ज्या शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले त्यांचे बियाणे उगवले, मग बाजारातून घेतलेले बियाणे का उगत नाही, असा प्रश्न उपस्थित करत बहुतांश तक्रारी या मध्य प्रदेशातील बियाण्यांविरोधात असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाºयांनी दिली. त्यामुुळे अशा बियाणे कंपन्यांसोबतच त्याची विक्री करणाºयांवरदेखील कारवाई होणारच, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात एकूण पेरणीतील ६० हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले आहेत. त्यामुळे त्यांचे तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे. या संदर्भात कृषी विभागाकडे दस्तऐवज आहेत; मात्र ज्यांचे बियाणे उगवले नाही, ते बहुतांश मध्य प्रदेशातील कंपन्यांचे आहेत. त्या विरोधात कृषी विभाग संबंधितांवर कारवाई करत आहे.- मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विभाग, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी