शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी ३६.७९ कोटींची मदत वितरित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 14:07 IST

. वितरित मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयांमार्फत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात प्राप्त झालेली ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपये मदतीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवार, ४ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली आहे. वितरित मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयांमार्फत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी शासन निर्णयानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी २९७ कोटी ९४ लाख ३० हजार रुपये मदत निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या दोन टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत शासनामार्फत १ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार उपलब्ध मदतीची रक्कम ४ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली असून, मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयांमार्फत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

आणखी हवे २४ कोटी!अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी तिसºया टप्प्यात ६० कोटी ८३ लाख ७७ हजार रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत शासनाकडून उपलब्ध झाली असली तरी जिल्ह्यातील शेतकºयांना मदतीचे वाटप करण्यासाठी आणखी २४ कोटी ४ लाख ३१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होण्याची गरज आहे.

तालुकानिहाय वितरित मदतीची रक्कम!अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत वाटपासाठी तिसºया टप्प्यात ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली.

  1.  अकोला तालुका -६ कोटी ७६ लाख ५५ हजार रुपये,
  2.  बार्शीटाकळी तालुका -५ कोटी ६७ लाख ९० हजार रुपये,
  3.  अकोट तालुका -७ कोटी ५१ लाख ७८ हजार रुपये,
  4.  तेल्हारा तालुका -६ कोटी ६२ लाख ८२ हजार रुपये,
  5.  बाळापूर तालुका -६ कोटी ४७ लाख ५० हजार रुपये,
  6.  पातूर तालुका -३ कोटी ३८ लाख ९१ हजार रुपये
  7.  मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी ३४ लाख रुपये

 

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला