शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

३६ हजार नवतरुण मतदार बजावणार मतदानाचा हक्क!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:24 IST

१८ ते १९ वर्षे वयोगटातील ३६ हजार २८८ नवतरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अकोला: विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात १५ लाख ७७ हजार २५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यामध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील ३६ हजार २८८ नवतरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर याच विधानसभा मतदारसंघात ३१ आॅगस्ट २०१९ अखेरपर्यंत एकूण १५ लाख ७७ हजार २५४ मतदारांची संख्या आहे. त्यामध्ये ८ लाख १२ हजार १८१ पुरुष व ७ लाख ६१ हजार ८६४ महिला मतदार असून, ४६ इतर मतदार आणि ३,१६३ सेवा मतदार आहेत. जिल्ह्यातील मतदारांमध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील ३६ हजार २८८ नवतरुण मतदारांचा समावेश आहे. विधासभा निवडणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील मतदारांसह नवतरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.३० ते ३९ वयोगटातील सर्वाधिक मतदार!जिल्ह्यात ३० ते ३९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच ३ लाख ६७ हजार २८४ आहे. तर २० ते २९ वर्षे वयोगटातील ३ लाख १६ हजार ३७० मतदार, ४० ते ४९ वर्षे वयोगटातील ३ लाख २९ हजार ५५९ मतदार, ५० ते ५९ वर्षे वयोगटातील २ लाख ४२ हजार १०३ मतदार, ६० ते ६९ वर्षे वयोगटातील १ लाख ४९ हजार ९०५ मतदार, ७० ते ७९ वर्षे वयोगटातील ८१ हजार ७७९ मतदार आणि ८० वर्षापेक्षा अधिक वयाचे ५० हजार ८०३ मतदार आहेत.मतदार नोंदणी!गत ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत नाव नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत. मतदार नोंदणी निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत मतदार मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावू शकतील.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019