शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३०० रुपयांच्या अनुदानासाठी ३५० रुपयांचा खर्च; सोयाबीनच्या परमिटसाठी शेतकऱ्यांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 16:00 IST

 मूर्तिजापूर: शासकीय अनुदानावर मिळणाºया सोयाबीनच्या एका ३० किलो बॅगेचे परमिट मिळविण्यासाठी मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ७ जून रोजी मोठी गर्दी करीत आहेत.

ठळक मुद्दे३०० रुपये अनुदानाचे परमिट मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती शेतकरी एक बॅग सोयाबीनसाठी गत तीन दिवसांपासून कृषी अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. येण्याजाण्यासह शंभर रुपये तर सातबारासाठी किमान ५० रुपये खर्च येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

- संजय उमक

 मूर्तिजापूर: शासकीय अनुदानावर मिळणाºया सोयाबीनच्या एका ३० किलो बॅगेचे परमिट मिळविण्यासाठी मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ७ जून रोजी मोठी गर्दी करीत आहेत. शेतकºयांना सोयाबीनच्या एका बॅगवर ३०० रुपयांचे अनुदान मिळत असले तरी त्यासाठी शेतकºयांना ३५० रुपयांचा खर्च होत असल्याचे चित्र आहे. शिवाय परमिट घेण्यासाठी वेळेचा अपव्ययही होत आहे.शासन अनुदानावर मिळणाºया सोयाबीनच्या बॅगची किंमत १,३५० रुपये तर बाजारात मिळणाºया सोयाबीन बॅगची किंमत १,७५० असल्याने केवळ ३०० रुपये अनुदानाचे परमिट मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती. त्यासाठी रोज २५ ते ३० किलोमीटर अंतरावरील शेतकरी एक बॅग सोयाबीनसाठी गत तीन दिवसांपासून कृषी अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. येण्याजाण्यासह शंभर रुपये तर सातबारासाठी किमान ५० रुपये खर्च येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. एकंदरीत ३५० रुपयांचा भुर्दंड बसत असल्याची शोकांतिका उपस्थित शेतकºयांनी व्यक्त केली आहे. त्यातही प्रत्येक दिवशी किमान २०० रुपये मजुरी पाडून येथे येत असल्याचे उपस्थित शेतकºयांनी सांगितले. अनुदान तत्त्वावर मिळणारे सोयाबीन एका दिवसात मिळाले तर शेतकºयांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही याची काळजी कृषी अधिकारी कार्यालयाने घेणे गरजेचे आहे आहे.  

 संपूर्ण तालुक्यासाठी ३ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाले असून, आजपर्यंत आम्ही पंधराशे क्विंटल बियाण्यांचे वाटप केले आहे. सुरुवातीला काही शेतकºयांनी आमची दिशाभूल केली आहे. एकाच सातबारावर दोन-दोन वेळा बियाणे उचलले असल्याने लक्षात आल्याने सर्व शहानिशा करूनच परमिट वाटप करण्यात येत आहे म्हणून थोडा विलंब लागत आहे.- चंदन जगन्नाथ निंघोटतालुका कृषी अधिकारी (प्रभारी) मूर्तिजापूर गत तीन दिवसांपूर्वी मी या कार्यालयात सात-बारा व आधार कार्डची सत्यप्रत जमा केली आहे. रोज चकरा मारूनही ३ दिवसापासून अजूनही मला परमिट मिळाले नाही. यासाठी माझा मजुरीसह ८०० रुपये खर्च झाला आहे. कृषी अधिकारी कार्यालयाने तत्परता दाखविली असती तर मला हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला नसता.- संजय अजाबराव बांबल, शेतकरी, शिराताळा 

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरFarmerशेतकरी