शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

अकोला परिमंडळात ४८ तासांत ३४० वीजचोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 7:09 PM

Msedcl महावितरणने गेल्या ४८ तासांत अकोला परिमंडलातील तीन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र राबवित वीजचोरीचे ३४० प्रकार उघडकीस आणले

अकोला : वीजचोरीच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी महावितरणने गेल्या ४८ तासांत अकोला परिमंडलातील तीन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र राबवित वीजचोरीचे ३४० प्रकार उघडकीस आणले. परिमंडालातील थकबाकी वसुलीचे आवाहन समोर असताना परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात वीजचोरीचा वाढलेला सुळसुळाट महावितरणसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे महावितरणने वीजचोराविरुद्ध ॲक्शन मोड घेत वेगवेगळ्या ठिकाणी नियोजनबद्ध मारलेल्या धाडीत परिमंडलात गेल्या ४८ तासांत ३४० वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये थेट वीजचोरी किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांची संख्या ही ३२६ आहे, तर १४ ग्राहकांनी ज्या कामासाठी विजेची मागणी केली होती त्यासाठी न वापरता इतर कामासाठी वापरत महावितरणची फसवणूक केली आहे. एकून १ लाख ५९ हजार २४१ युनिटच्या ( १६ लक्ष ६५ हजार रुपये) वीजचोरीत ग्राहकांनी दंडासहित रक्कम भरली नाही तर संबंधितावर विद्युत कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

थकबाकी वसूल न झाल्याने महावितरण आर्थिक अडचणीतून जात असताना वीजचोरांनी घातलेला धुमाकूळ महावितरणचे कंबरडे मोडणारा आहे. यापुढे महावितरण अकोला परिमंडलाअंतर्गत नियमित मोहिमा राबवित वीजचोरांवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोलाAkola Zoneअकोला परिमंडळ