शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पश्चिम विदर्भात ३३ हजारावर कृषीपंप वीज जोडणी प्रलंबित

By atul.jaiswal | Updated: August 14, 2018 15:05 IST

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्याला महावितरणकडून प्राधान्य दिले जात असले, तरी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अजुनही ३३ हजार ३४५ कृषीपंप वीज जोडण्या प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देराज्यभरातील हजारो शेतकरी अजुनही कृषीपंप जोडणी मिळण्यासाठी प्रतिक्षा करत आहेत. कृषीपंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस)वीज जोडणी देण्यासाठी महावितरण पाऊल टाकले आहे.

- अतुल जयस्वालअकोला : राज्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्याला महावितरणकडून प्राधान्य दिले जात असले, तरी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये अजुनही ३३ हजार ३४५ कृषीपंप वीज जोडण्या प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत प्रलंबित असलेल्या कृषीपंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस)वीज जोडणी देण्यासाठी महावितरण पाऊल टाकले आहे.कृषीपंपांना वीज जोडण्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी विविध योजना काढल्यानंतरही हा अनुशेष कमी होण्याची चिन्हे नाहीत. राज्यभरातील हजारो शेतकरी अजुनही कृषीपंप जोडणी मिळण्यासाठी प्रतिक्षा करत आहेत. आतापर्यंत पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये ३३ हजार ३४५ कृषी पंप ग्राहकांनी पैसे भरल्यानंतरही त्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ५७२१, बुलडाणा जिल्ह्यातील ७६९९, वाशिम जिल्ह्यातील ७१५९, अमरावती जिल्ह्यातील ५३०९ व यवतमाळ जिल्ह्यातील ७४०७ कृषी पंप वीज जोडण्या प्रलंबित आहेत.उच्चदाब वितरण प्रणाली ठरणार फायदेशिरशेतकºयांच्या कृषीपंपांना जोडणी देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) सुरु करण्यात येणार आहे. नव्या उच्चदाब प्रणालीत उच्चदाब वाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही. नव्या प्रणालीमध्ये एका रोहित्रावरून दोन अथवा जास्तीत जास्त तीनच कृषिपंपांना वीज जोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे रोहित्रावर ताण येणार नाही. तो जळणार नाही. आकडा टाकून वीज घेता येणार नाही. ही प्रणाली राबविण्यासाठी नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलाने निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळ