शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ३०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या लवकरच बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 10:45 IST

शासनाने दिलेल्या आदेशानंतर बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू असून, १५ टक्के कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्यांचा पोळा लवकरच फुटणार आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील सुमारे ३०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. शासनाने दिलेल्या आदेशानंतर बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू असून, १५ टक्के कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्यांचा पोळा लवकरच फुटणार आहे.पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया मे महिन्यात पूर्ण झाल्यानंतर बदल्यांची यादी जाहीर करण्यात येते; मात्र यावर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती; मात्र जुलै महिन्यात अधिकारी व कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणावरून १५ टक्के बदल्या करण्याचा आदेश आल्यानंतर आता या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्यातील ३०० पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी फेब्रुवारी महिन्यातच एकाच ठिकाणी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाºया कर्मचाºयांची यादी मागविली होती. यावेळी ३ पर्यायी ठिकाण बदल्यांसाठी मागण्यात आले होते; मात्र यानुसार काही कर्मचारी गुंतागुंत करीत असल्याचे गावकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाºयांना पाच पर्यायी ठिकाण देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बदली प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन सुरू होताच कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाने बदल्या स्थगित केल्या होत्या. त्यानुसार अकोला पोलीस दलातील कर्मचाºयांच्या बदल्याही रखडल्या होत्या; मात्र आता त्याच माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीही पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी सुरू करण्याचे काम जोरात सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा पोलीस दलातील ३०० पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

मीना यांनी काढली होती मक्तेदारी मोडीतशहरातील पोलीस ठाणे तसेच काही महत्त्वाच्या ठिकाणांवर काही मोजके पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. वर्षानुवर्ष त्यांचेच या पदावर राज्य असून, अशा कर्मचाºयांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केले होते. त्यानुसारच बदल्या होण्याची आशा प्रामाणिक पोलिसांना असून, आता बदल्यांच्या यादीकडे लक्ष लागले आहे.

आठ जणांची खुफिया कर्मचारी म्हणून नियुक्तीपोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या ८ पोलीस कर्मचाºयांची खुफिया कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रत्येक पोलीस कर्मचाºयास एका तालुक्याची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांनी त्यांच्या तालुक्याची खुफिया माहिती ठेवणे तसेच त्याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस