मूर्तिजापूर : शहरातील जुनी वस्तीमधील घरकुलमध्ये अचानक आग लागली. या आगीत घरात अवैधपणे ठेवलेल्या पेट्रोलने पेट घेतल्याने तीन लाखांचे नुकसान झाले. पेट्रोल असल्याने आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. ही आग विझवताना तिघे जखमी झाले.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुनी वस्ती येथे रजीया अयूब खान या महिलेच्या घराला बुधवारी रात्री अचानक आग लागली. घरात अवैध व बेकायदेशीरपणे ठेवलेल्या ३०० लीटर पेट्रोलने पेट घेतल्याने आगडोंब उसळला. या संदर्भात माहिती मिळताच तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार वैभव फरताडे, श्रीकांत मिसाळे, तलाठी जी. जी. भारती, गुलाब दुबे, शे. इमरान शे .खलील, द्वारका दुबे, नासीर आसीफ खान, संदीप जळमकर, संजय नाईक, संजय गुल्हाने, वसिमोद्दीन ऊर्फ गब्बर, दिनेश दुबे, शाकीरोद्दीन ऊर्फ कालू, अमीरद्दीन, अ. तोहीद सैफोद्दीन, नजाकत खान, जावेद खान, सै.मोसीन, नासीर बिहारी, जुबेर खान, शारुक खान, नाजीम पहेलवान, शे. वसीम, अमोल गायकवाड, जसीमोद्दीन, फिरोज खान, एकबाल खान अशफाकोद्दीन आदींसह इतरांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच मूर्तिजापूर, दर्यापूर, कारंजा व अकोला येथून अग्निशमन दलाच्या बंबांनासुद्धा पाचारण करण्यात आले होते. या वेळेस ज्वलनशील पदार्थांसोबत घरातील फ्रिज, टीव्ही, किमती कपडे व इतर वस्तू जळून खाक झाल्या. आग विझवताना अयूब शे. युनूस, अब्दुल साहील अ. सत्तार, अजमत शा हे जखमी झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी डॉ. गौरव गोसावी यांनी करून १५ टक्के जळल्याची माहिती दिली.
घरात अवैधरित्या ठेवलेल्या ३०० लीटर पेट्रोलचा भडका; मूर्तिजापुरात घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 15:29 IST
मूर्तिजापूर : शहरातील जुनी वस्तीमधील घरकुलमध्ये अचानक आग लागली. या आगीत घरात अवैधपणे ठेवलेल्या पेट्रोलने पेट घेतल्याने तीन लाखांचे नुकसान झाले.
घरात अवैधरित्या ठेवलेल्या ३०० लीटर पेट्रोलचा भडका; मूर्तिजापुरात घर जळून खाक
ठळक मुद्देजुनी वस्ती येथे रजीया अयूब खान या महिलेच्या घराला बुधवारी रात्री अचानक आग लागली.घरात अवैध व बेकायदेशीरपणे ठेवलेल्या ३०० लीटर पेट्रोलने पेट घेतल्याने आगडोंब उसळला.मूर्तिजापूर, दर्यापूर, कारंजा व अकोला येथून अग्निशमन दलाच्या बंबांनासुद्धा पाचारण करण्यात आले होते.