शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी अमरावती विभागात ३० हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 13:10 IST

अकोला : युवक काँग्रेसच्या राज्यासह जिल्हा स्तरावरील विविध पदांसाठी रविवारपासून मतदान घेण्यात येणार असून, यासाठी अमरावती विभागातील तब्बल ३० हजार युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मतदान करणार आहेत.

ठळक मुद्देसर्वाधिक मतदारांची नोंद अमरावती जिल्ह्यात. ९, १० व ११ सप्टेंबर रोजी टॅबमधील एका अ‍ॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तब्बल ३० हजारांवर युवक काँग्रेसच्या सदस्यांची नोंदणी झालेली आहे.

- सचिन राऊत

अकोला : युवक काँग्रेसच्या राज्यासह जिल्हा स्तरावरील विविध पदांसाठी रविवारपासून मतदान घेण्यात येणार असून, यासाठी अमरावती विभागातील तब्बल ३० हजार युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मतदान करणार आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदारांची नोंद अमरावती जिल्ह्यात असून, त्यानंतर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात नोंदणी करण्यात आली आहे.युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यभरात ९, १० व ११ सप्टेंबर रोजी टॅबमधील एका अ‍ॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यभर युवक काँग्रेस सदस्यांची नोंदणी करण्यात येत असताना अमरावती विभागातही नोंदणी करण्यात आली असून तब्बल ३० हजारांवर युवक काँग्रेसच्या सदस्यांची नोंदणी झालेली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी आ. अमित झनक, सत्यजित तांबे व कुणाल राऊत रिंगणात आहेत, तर प्रदेश महासचिव पदासाठी सागर देवेंद्र कावरे, अभिषेक भरगड, सागर देशमुख व श्रेयश इंगोले उभे आहेत. यासोबतच जिल्हाध्यक्ष पदासाठी महेश गणगणे, निनाद मानकर, तर शहराध्यक्ष पदासाठी अंशुमन देशमुख, आकाश शिरसाट, सुमती गवई उभे आहेत. जिल्हा महासचिव पदासाठी अभिलाष तायडे, फारुख पटेल रिंगणात आहेत.जिल्हानिहाय मतदारांची संख्याअकोला -                      ८०१३अमरावती -                 ८३६३बुलडाणा -                   ८२८४वाशिम -                     ३५२८---------------------------------

आज अकोटमध्ये मतदानयुवक काँग्रेसच्या पदांसाठी ९, १० व ११ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यात म्हणजेच रविवारी अकोला जिल्ह्यातील केवळ अकोट तालुक्यात मतदान होणार आहे. जिल्ह्यात अकोट तालुक्यात सर्वाधिक मतदारांची संख्या असून, त्यामुळे पहिल्या टप्प्यात केवळ अकोटमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तरांचल येथील २२ जणांची टीम दाखल झाली आहे.काँग्रेसमधील दुसरी फळी एकवटली!राज्य स्तरावरील प्रदेश महासचिव पदासाठी जिल्ह्यातून सागर कावरे व अभिषेक भरगड रिंगणात आहेत. कावरे यांच्यासाठी काँग्रेसमधील मराठा कार्ड चालविण्याचा प्रयत्न होत असून, दुसरी फळी एकवटून काम करीत असल्याचे चित्र आहे. अभिषेक भरगड यांच्यासाठीही एक फळी जोमाने कामाला लागली आहे.

एका मिनिटात पाच उमेदवारांना मतदानया टॅबमधील एका अ‍ॅपद्वारे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष या पाच उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. ‘अ‍ॅप’द्वारे पाच उमेदवारांना मतदान करण्यासाठी एक मिनीट नऊ सेकंद वेळ मिळणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस