शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पाणीटंचाई निवारणाच्या थकीत देयकापोटी २.७५ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 14:59 IST

अकोला : जिल्ह्यात गत उन्हाळ्यात करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी शासनामार्फत २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात गत उन्हाळ्यात करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी शासनामार्फत २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधी सोमवारी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येणार आहे.गत उन्हाळ्यात जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाच्या विविध उपाययोजनांची कामे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह संबंधित यंत्रणांकडून करण्यात आली होती. पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांपैकी काही कामांची देयके अद्याप थकीत आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत १२ नोव्हेंबर रोजी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येणार आहे. या निधीतून जिल्हा परिषदेमार्फत पाणीटंचाई निवारणाच्या विविध कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.उपाययोजनानिहाय असा आहे उपलब्ध निधी!पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी शासनामार्फत २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यामध्ये नवीन विंधन विहिरी व कूपनलिका- ७२ लाख ३५ हजार रुपये, नळ योजनांची विशेष दुरुस्ती- ५४ लाख २७ हजार रुपये, तात्पुरती पूरक नळ योजना -३६ लाख १८ हजार रुपये, टँकरद्वारे पाणी पुरवठा -९० लाख ५० हजार रुपये आणि खासगी विहिरींच्या अधिग्रहणाची देयके अदा करण्यासाठी २१ लाख ७० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय