शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

अकोला जिल्ह्यात २७ टक्के पाऊस कमीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 10:49 IST

Weather news Akola २७ टक्के पावसाची तूट असल्याचे दाखविले आहे.

अकोला : जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत २७ टक्के पाऊस कमी झाल्याची नोंद भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे. पातूर तालुक्यात मात्र सरासरीच्या १४ टक्के पाऊस अधिक झाला आहे. परतीचा पाऊस यावर्षीही लांबला असल्याची माहिती कृषी हवामान शास्त्रज्ञांनी दिली.जिल्ह्यात जून ते सप्टेंबरपर्यंतचा सरासरी पाऊस हा ६९३.७ मि.मी. आहे. गत ३० वर्षांच्या नोंदीनुसारी ही आकडेवारी आहे. यावर्षी प्रत्यक्षात ५०४.५ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट असल्याचे दाखविले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात ५८६.६ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. या आकडेवारीनुसार पातूर तालुक्याची सरासरी ८०१.२ आहे. यावर्षी पातूर तालुक्यात ९१५.४ मि.मी. पाऊस पडला. ही टक्केवारी ११४.३ असून, येथे १४.३ टक्के पाऊस अधिक झाला आहे. बाळापूर तालुक्यातही सरासरी पाऊस पडला. या तालुक्याची ६१४.२ मि.मी. सरासरी आहे. प्रत्यक्षात ६१४.९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. म्हणजेच येथे १०१.१ पाऊस पडला आहे. इतर तालुक्यांपैकी अकोटची सरासरी ६७९.९ आहे. प्रत्यक्षात ५३९.८ मि.मी. नोंद झाली आहे. या तालुक्यात सरासरीच्या ७९.४ टक्के म्हणजेच २० टक्के पाऊस कमी झाला. तेल्हारा तालुक्याची सरासरी ६६४.५ मि.मी. आहे. प्रत्यक्षात ५८१.३ मि.मी. पाऊ स झाला हा पाऊस सरासरीच्या ८७.५ टक्के असून, १३ टक्के कमी झाला आहे. अकोला तालुक्याची सरासरी ७०३.४ मि.मी. एवढी आहे. या तालुक्यात प्रत्यक्षात ५३४.७ मि.मी. सरासरीच्या ७६ टक्के हा पाऊस असून, २४ टक्के कमी आहे.मूर्तिजापूर तालुक्याचा सरासरी पाऊस ७११.२ मि.मी. आहे. यावर्षी प्रत्यक्षात ५२६.८ मि.मी. सरासरीच्या ७४.१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. या तालुक्यात सर्वाधिक २६ टक्के पावसाची तूट आहे.अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक तूटजिल्ह्यात पातूर आणि बाळापूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला असला तरी अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात हा पाऊस कमी आहे. मूर्तिजापूर तालुक्यात २६ तर अकोला तालुक्यात २४ टक्के पावसाची तूट आहे.परतीचा पाऊस लांबला!यावर्षीही परतीचा पाऊस लांबला असून, येत्या १५ आॅक्टोबरनंतर परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविली आहे. विदर्भात मात्र येत्या दोन-तीन दिवस तरी पावसाची चिन्हे नाहीत, असे त्यांनी सांगितले.बुलडाणा, वाशिमने सरासरी ओलांडली!यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात ५ तर वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या १६ टक्के पाऊस अधिक झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस