शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

२५ अतिरिक्त शिक्षक निवडणूक विभागातील सेवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 13:42 IST

कामच नसलेल्या शिक्षकांवर अखेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या २५ शिक्षकांना शाळा रुजू करून घेत नसल्याने त्यांच्या समायोजनाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

अकोला: माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६२ शिक्षकांपैकी २५ शिक्षकांना शाळांनी रुजू करून न घेतल्यामुळे या शिक्षकांना ना शाळा राहिली ना शिकवायला विद्यार्थी. कामच नसलेल्या शिक्षकांवर अखेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या २५ शिक्षकांना शाळा रुजू करून घेत नसल्याने त्यांच्या समायोजनाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.जिल्ह्यात माध्यमिक शाळांमधील ६२ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी सर्वच शिक्षकांचे समायोजन झाले. ३७ शिक्षक विविध शाळांवर रुजू झाले; परंतु उर्वरित २५ शिक्षकांना मात्र काही अडचणींमुळे शाळांनी रुजू करून घेतले नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या अडचणी वाढल्या. शाळा, विद्यार्थी नसल्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांना केवळ शिक्षणाधिकारी कार्यालयात हजेरी लावण्यापुरतेच काम उरले होते. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामासाठी निवडणूक विभागाला मनुष्यबळाची गरज असल्याने, त्यांनी शिक्षण विभागाकडे विचारणा केल्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अतिरिक्त शिक्षकांची माहिती देण्यात आली. या सर्व २५ अतिरिक्त शिक्षकांची सेवा १४ जानेवारीपासून तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात संलग्न केली आहे. शिकविण्याचे काम करण्याऐवजी या अतिरिक्त शिक्षकांना तहसील कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहून नायब तहसीलदारांच्या मार्गदर्शनात निवडणुकीची कामे करावी लागत आहेत. निवडणुकीचे कार्यसुद्धा राष्ट्रहिताचे असल्यामुळे या सर्व शिक्षकांनी या कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. (प्रतिनिधी)या अतिरिक्त शिक्षकांची सेवा निवडणूक विभागात!एम.एस. खंडारे, शारदा बायस्कार, वंदना गोटे, विजय गोटे, प्रतिभा अवताडे, अरविंद यादव, प्रकाश घाटोळ, सतीश गोकणे, देवीदास लाहोळे, स्नेहल यादव, विजय ढोणे, राम पोरे, सविता बाजपीय, अजित सपकाळ, प्रतिभा धोरण, सुभाष काकड, संजय राजहंस, नीलेश ढोकणे, सतीश राऊत, अरविंद मिश्रा, प्रशांत करांगे, राहुल भगत, अनिल घाटोळ, राजेश बरेठिया व आशिष गिरे या अतिरिक्त शिक्षकांची सेवा निवडणूक विभागात संलग्न करण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक