अकोला जिल्ह्यातील २४०१ अंगणवाडी सेविकांना मिळणार भाऊबीज भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 11:10 AM2020-11-28T11:10:56+5:302020-11-28T11:18:05+5:30

Anganwadi workers News प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे भाऊबीज भेट मिळणार आहे.

2401 Anganwadi workers in Akola district will get Honororium |  अकोला जिल्ह्यातील २४०१ अंगणवाडी सेविकांना मिळणार भाऊबीज भेट!

 अकोला जिल्ह्यातील २४०१ अंगणवाडी सेविकांना मिळणार भाऊबीज भेट!

Next
ठळक मुद्दे४८ लाख रुपयांचा निधी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना वितरित.रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

अकोला: दिवाळी झाल्यानंतर जिल्ह्यातील २ हजार ४०१ अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे भाऊबीज भेट मिळणार आहे. त्यासाठी शासनामार्फत प्राप्त ४८ लाख २ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना दिवाळी भेट देण्यासाठी शासनाकडून दिवाळीनंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत १८ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांमार्फत भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपयांची रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर जिल्ह्यातील ४ हजार ४०२ अंगणवाडी सेविका, मदतनिसांना भाऊबीजची भेट मिळणार आहे.

 

जि.प.च्या महिला बालकल्याण विभागाला किती पैसे मिळाले?

 

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मतदनीसांना दिवाळीची भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये देण्यासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला ४८ लाख २ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांना वितरित करण्यात आला असून, त्यांच्याकडून भाऊबीज भेटीची रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना भाऊबीज भेट देण्यासाठी दिवाळीनंतर शासनाकडून ४८ लाख २ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. हा निधी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला असून, प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे भाऊबीज भेटीची रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

- विलास मरसाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद.

दिवाळी झाली; मात्र अद्याप भाऊबीज भेट म्हणून २ हजार रुपयांची रक्कम मिळाली नाही. अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीच्या कालावधीतच भाऊबीज भेटीची रक्कम मिळाली पाहिजे.

- उषा सुनील गोपनारायण, अंगणवाडी सेविका, भाैरद.

Web Title: 2401 Anganwadi workers in Akola district will get Honororium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.