शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात रब्बी पिकांची २३ टक्के पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 14:19 IST

वाशिम : जिल्ह्यात रब्बी हंगामात ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, आतापर्यंत २२ हजार हेक्टरच्या आसपास पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी २३.६५ अशी येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात रब्बी हंगामात ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून, आतापर्यंत २२ हजार हेक्टरच्या आसपास पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी २३.६५ अशी येते.खरिप हंगामात पिकांना ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत निसर्गाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेला आहे. अनियमित व अल्प पावसामुळे खरिपातील शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट आली. माळरान तसेच हलक्या प्रतीच्या जमिनीतून तर लागवडी खर्चही वसूल झाला नसल्याचा दावा शेतकºयांनी केला. आता शेतकºयांची सर्व भिस्त रब्बी पिकांवर आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, रब्बी हंगामात ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, सुर्यफुल आदी पिकांची पेरणी होणार आहे. सर्वाधिक क्षेत्रफळावर अर्थात ६२ हजार ३९२ हेक्टरवर हरभºयाची पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आतापर्यंत १८ हजार हेक्टरच्या आसपास पेरणी झाली आहे.गहू पिकाचा पेरा २८ हजार ४९७ हेक्टर, रब्बी ज्वारी १३९७ हेक्टर, मका ६९ हेक्टर, सुर्यफुल २२ हेक्टर, इतर तृणधान्य २०१, इतर गळीत धान्य १२४ हेक्टर असे एकूण ९२ हजार ९९६ हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत आतापर्यंत २२ हजार हेक्टरच्या आसपास पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी २३.६५ अशी येते.परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने कोरडवाहू शेतकरी संभ्रमात असल्याचे दिसून येते. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी हरभºयाला प्रथम पसंती देत असून त्याखालोखाल गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला.तांत्रिक बिघाड, अनियमित वीजपुरवठा, नादुरूस्त विद्युत रोहित्र आदींमुळे सिंचन करण्यातही अडथळे निर्माण होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत. जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्याने कोरडवाहू शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती