शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

अकोला जिल्ह्यातील २७८९ गारपीटग्रस्तांसाठी २.२२ कोटींची मदत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:25 IST

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील १ हजार ८६० हेक्टरवरील पीक नुकसान भरपाईपोटी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकºयांसाठी २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांची मदत शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१८६० हेक्टरवरील पिकांचे झाले होते नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील १ हजार ८६० हेक्टरवरील पीक नुकसान भरपाईपोटी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकºयांसाठी २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांची मदत शासनामार्फत मंजूर करण्यात आली आहे. गत ११ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अवकाळी पावसासह गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आल्यानंतर पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाच तालुक्यांमध्ये २ हजार ७३९ शेतकºयांचे १ हजार ८६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये हरभरा, गहू, संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व इतर भाजीपाला पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे.  ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील गारपीटग्रस्त २ हजार ७८९ शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत २ कोटी २२ लाख ३६ हजार ३७५ रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिरायत क्षेत्रासाठी प्रती हेक्टर ६ हजार ८०० रुपये, बागायत क्षेत्रासाठी प्रती हेक्टर १३ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला मदत निधी उपलब्ध झाल्यानंतर मदतीची रक्कम गारपीटग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. 

पिकांचे नुकसान आणि अशी आहे मंजूर मदत!जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झालेल्या ८५० हेक्टर २० आर क्षेत्रावरील पीक नुकसान भरपाईपोटी ५७ लाख ८१ हजार ३६० रुपये, ४४३ हेक्टर ६३ आर बागायत क्षेत्रावरील पीक नुकसान भरपाईपोटी ६२ लाख ६० हजार ३५५ रुपये आणि ५६६ हेक्टर ३७ आर क्षेत्रावरील फळ पिकांच्या नुकसान भरपाईपोटी १ कोटी १ लाख ३४ हजार ६६० रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

टॅग्स :HailstormगारपीटAkolaअकोला