लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने २१ मंडळांना पुरस्कार वितरित करण्यात आले. शनिवारी स्थानीय ग्रीनलँड सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सार्वजनिक गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष गुलाबराव गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर गाडगीळ, महापौर विजय अग्रवाल, मंडळाचे अध्यक्ष अँड. मोतीसिंह मोहता, हरिदास भदे, श्रीकृष्ण ढोरे, अँड. अशोक शर्मा, संग्राम गावंडे, मनोज खंडेलवाल, आशिष पवित्रकार, गजानन दाळू गुरुजी, हरीश आलिमचंदानी, रमाकांत खेतान, अँड. सुभाषसिंह ठाकूर, डॉ. अशोक ओळंबे, विजय जयपिल्ले, मनोहर पंजवानी, मंगेश काळे, अश्विन नवले, सतीश ढगे, संतोष पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अतिथींच्या हस्ते स्व. कमलाबाई खेतान यांच्या स्मृतीत व्यापारी संकुल गणेश मंडळ, जठारपेठ, जागेश्वर मंदिर मंडळ यांना तर स्व. गोदावरीबाई मोहता यांच्या स्मृतीत बालक गणेशोत्सव सिंधी कॅम्प, समाजसेवा गणेशोत्सव दाबकी रोड, स्व. कृष्णाबाई ठाकूर यांच्या स्मृतीत श्रीराम गणेशोत्सव तापडिया नगर, वीर लहूजी गणेशोत्सव खोलेश्वर, स्व. पारियालदास पंजवानी यांच्या स्मृतीत संघर्ष गणेशोत्सव रतनलाल प्लॉट, जय भवानी व्यायामशाळा शिवापूर, स्व. सुरेंद्र कुमार शहा यांच्या स्मृतीत युवा पिढी गणेशोत्सव तहसील चौक, आझाद गणेशोत्सव राधे नगर, शास्त्री नगर गणेशोत्सव, नवयुवक गणेशोत्सव जठारपेठ, श्री बजरंग खुले नाट्यगृह चौक, स्व. मंगेश गावंडे यांच्या स्मृतीत खोलेश्वर पालकी गणेशोत्सव, मोरया गणेशोत्सव खेतान नगर, तेलगू व्यायामशाळा, वीर हनुमान व्यायामशाळा जुने शहर यांना शाल, नारळ, पदक व रोख रुपयांचा पुरस्कार बहाल करण्यात आला. इको फ्रेंडली सजावटीत डेल्टा गणेशोत्सव, रामभरोसे गणेशोत्सव, लहरी गणेशोत्सव गांधी मार्ग, शिव नगर गणेशोत्सव, श्री गणेशोत्सव आदींना बहाल करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय तिवारी यांनी केले. पारितोषिक संचालन सिद्धार्थ शर्मा यांनी, तर आभार संग्राम गावंडे यांनी मानले. यावेळी नीरज शाह, मनोज साहू, जयशंकर त्रिवेदी, संतोष अग्रवाल, अँड. श्याम खोटरे, अँड. सौरभ शर्मा, बंडू ढोरे, विनोद मनवाणी, गोपाळ नागपुरे, शिव पाटील, विक्की ठाकूर, राम साहू, चंद्रशेखर शेळके, उमाकांत कवडे, राजेंद्र वानखडे, संजय चौधरी, पंजाबराव काळे, ज्ञानेश्वर खोडके, प्रदीप खंडेलवाल, अरुण गुजरसमवेत महानगरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
२१ गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:59 IST
अकोला : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने २१ मंडळांना पुरस्कार वितरित करण्यात आले. शनिवारी स्थानीय ग्रीनलँड सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सार्वजनिक गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष गुलाबराव गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
२१ गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार
ठळक मुद्देसार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने पुरस्कार वितरितग्रीनलँड सभागृहात पार पडला कार्यक्रम