शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २ हजार ७१२ अतिरिक्त शिक्षक शाळेविना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 12:57 IST

१,४६५ शिक्षकांपैकी ८४६ शिक्षकांना शाळांनी रुजूच केले नसल्याने सद्यस्थितीत २,७१२ अतिरिक्त शिक्षक शाळेविना आहेत.

ठळक मुद्देसप्टेंबर २०१७ मध्ये राज्यात माध्यमिक शाळांमधील ३ हजार ३३१ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यापैकी १,४६५ अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांच्या माध्यमातून आॅनलाइन समायोजन झाले.१,४६५ शिक्षकांपैकी ८४६ शिक्षकांना शाळांनी रुजूच केले नसल्याने सद्यस्थितीत २,७१२ अतिरिक्त शिक्षक शाळेविना आहेत.

- नितीन गव्हाळे

 अकोला : सप्टेंबर २०१७ मध्ये राज्यात माध्यमिक शाळांमधील ३ हजार ३३१ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यापैकी १,४६५ अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांच्या माध्यमातून आॅनलाइन समायोजन झाले; परंतु त्यातही १,४६५ शिक्षकांपैकी ८४६ शिक्षकांना शाळांनी रुजूच केले नसल्याने सद्यस्थितीत २,७१२ अतिरिक्त शिक्षक शाळेविना आहेत. त्यामुळे शासनाने आदेश काढून अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समायोजन करण्यास बजावले. मात्र, शासनाच्या या आदेशाला जिल्हा परिषदांनी ठेंगा दाखवित, एक वर्ष झाल्यानंतरही अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.सप्टेंबर २०१७ मधील समायोजन प्रक्रियेदरम्यान कमी रिक्त पदे आणि अतिरिक्त शिक्षकांची संख्या तिप्पट असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे शेकडो शिक्षकांचे शिक्षणाधिकारी, उपसंचालक स्तरावर समायोजन करण्यात आले. २०१६ व १७ च्या संच मान्यतेनुसार माध्यमिक शाळांमधील रिक्त जागाच नसल्याने राज्यातील १,८६६ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनच झाले नाही आणि समायोजन झालेल्या १,४६५ शिक्षकांपैकी ८४६ शिक्षकांना शाळांनी रुजूच करून घेतले नाही. अशा एकूण २ हजार ७१२ अतिरिक्त शिक्षकांना नियुक्तीसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. यासाठी शिक्षकांनी शासनदरबारी सातत्याने रेटा लावल्यानंतर शासनाने आता या अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषदमध्ये हजर करून नियुक्ती देण्याचा आदेशच ३१ आॅगस्ट रोजी शासनाने दिले आहेत. परंतु जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची संख्या, पदांची स्थिती लक्षात घेता, अतिरिक्त शिक्षकांना नियुक्ती मिळेल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह कायम राहण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदांमधील बिंदुनामावलीचा अडथळा!शासनाने अतिरिक्त शिक्षकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये नियुक्ती देण्याचा आदेश दिला आहे. परंतु राज्यामधील अनेक जिल्हा परिषदांमध्ये बिंदुनामावली मंजूर नाही. शिक्षकांची पदे रिक्त नाहीत. त्यामुळे या शिक्षकांना सामावून तरी कोठे घ्यावे, असा प्रश्न जिल्हा परिषदांना पडला आहे.अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश जिल्हा परिषदांना दिला आहे. त्यावर अतिरिक्त शिक्षकांना कसे सामावून घेता येईल. यावर आम्ही काम करतो आहोत. हा प्रश्न शिक्षण विभागाला लवकरच मार्गी लावायचा. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.विशाल सोळंकीराज्याचे शिक्षण आयुक्त

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक