शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजराजेश्वर कन्स्ट्रक्शनला २ लाख ३१ हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 02:16 IST

बार्शीटाकळी : तालुक्यातील पिंपळखुटा येथील साई स्टोन इंडस्ट्रिज येथून गौण खनिजाची नियमानुसार वाहतूक न केल्याच्या कारणावरून मूर्तिजापूरच्या उप विभागीय अधिकाºयांनी अकोला येथील राजराजेश्वर कन्स्ट्रक्शन तथा अकोल्याचेच पी.पी. देशमुख यांना सोमवारी २ लाख ३१ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

ठळक मुद्देगौण खनिज वाहतूक नियमानुसार न करणे भोवले!

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : तालुक्यातील पिंपळखुटा येथील साई स्टोन इंडस्ट्रिज येथून गौण खनिजाची नियमानुसार वाहतूक न केल्याच्या कारणावरून मूर्तिजापूरच्या उप विभागीय अधिका-यांनी अकोला येथील राजराजेश्वर कन्स्ट्रक्शन तथा अकोल्याचेच पी.पी. देशमुख यांना सोमवारी २ लाख ३१ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. उप विभागीय अधिकारी भागवत सैदाने हे १९ एप्रिल रोजी शासकीय दौ-यावर असताना त्यांना दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कान्हेरी सरप शिवारात अकोल्याच्या सिंधी कॅम्प भागातील रहिवासी वाहन चालक भगवान नारायण पाईकराव हा वाहन एम.एच. ३१ एम ४६६० क्रमांकाच्या वाहनातून गौण खनिजात समावेश असलेल्या तीन ब्रास मुरुमाची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी सदर वाहनाची पडताळणी केली असता वाहन चालकाने दाखविलेल्या पास क्र. ११६२२४ वर गौण खनिजाचा प्रकार नमूद केलेला नव्हता व पास क्र. ११६२२३, ११६२२५ वर गौण खनिजाचा प्रकार नमूद केला असला, तरी त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आढळून आला नाही. तसेच सदर दोन्ही पासवर गौण खनिजाचा प्रकार ‘मेटल’ असल्याचे नमूद केले होते. परंतु, प्रत्यक्षात तपासणी करीत असताना गैर अर्जदाराच्या वाहनात मुरूम असल्याचे आढळून आले. वाहनचालक भगवान नारायण पाईकराव यांनी दिलेल्या बयानात सदर तीन ब्रास मुरुम साई स्टोन इंडस्ट्रिज येथून आणला असून, तो अकोला येथील सतीश मोटर्सच्या बाजूला टाकण्यासाठी तो घेऊन जात असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी मूर्तिजापूरचे उप विभागीय अधिकारी भागवत सैदाने यांनी अकोल्याच्या राजराजेश्वर कन्स्ट्रक्शन तथा अकोल्याचे पी.पी. देशमुख यांना २ लाख ३१ हजार २०० रुपये दंड केला आहे. 

बार्शीटाकळी तालुक्यातून सर्रास गौण खनिजाची चोरी बार्शीटाकळी तालुक्यातील सराव व पिंपळखुटा परिसरात काही स्टोन क्रेशरधारक बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व त्याची विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे उप विभागीय अधिकाºयांनी केलेल्या उपरोक्त कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे एकाच पासवर दिवसभर गौण खनिजाची वाहतूूक, मेटलच्या पासवर गौण खनिज व मुरूमाची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळी