शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

१,९८७ नागरिकांंनी केले अर्ज; घरकुल मिळाले केवळ दहा लाभार्थींनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 15:29 IST

रमाई आवासमधून ८; तर पंतप्रधान आवास योजनेतून २ अशा केवळ १० लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाल्याची बाब उघड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : शासनाच्या आदेशावरून स्थानिक नगर पंचायतीने रमाई आवास व पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करित शहरातील नागरिकांकडून अर्ज स्विकारले. त्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना अर्ज शुल्काच्या नावाखाली सुमारे ५ लाखांचा भुर्दंड बसला. प्रत्यक्षात मात्र विविध स्वरूपातील किचकट अटी लादण्यात आल्याने दोन्ही योजनांसाठी दाखल झालेल्या १९८७ अर्जांपैकी रमाई आवासमधून ८; तर पंतप्रधान आवास योजनेतून २ अशा केवळ १० लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाल्याची बाब उघड झाली.रमाई आवास योजनेअंतर्गत मालेगाव नगर पंचायतला ७५ घरकुल वाटपाचे उद्दीष्ट मिळाले होते. त्यासाठी २०० लाभार्थ्यांनी रितसर अर्ज सादर केले; मात्र अटींची पुर्तता न केल्याच्या कारणावरून नगर पंचायतीने २०० पैकी केवळ ११ अर्ज मंजूर केले. त्यातही ८ लाभार्थ्यांनाच प्रत्येकी ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात आला. तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १७८७ लोकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी केवळ १९४ अर्ज मंजूर झाले. त्यातही प्रत्यक्षात केवळ २ लाभार्थ्यांचेच अर्ज परिपूर्ण असल्याचे सांगत संबंधितांनाच घरकुलांसाठी प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात आले. उर्वरित १७७६ लोकांनी यासाठी केलेला खटाटोप आणि खर्च पूर्णत: व्यर्थ ठरला. यामुळे गोरगरिब लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

 

टॅग्स :washimवाशिम