शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

लोकसभा निवडणुकीसाठी १९८ लालपरी दोन दिवस बुक, प्रवाशांना बसणार फटका

By atul.jaiswal | Published: April 21, 2024 3:47 PM

Lok Sabha election : अकोला लोकसभा मतदारसंघात म्हणजे २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे.

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार, २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, मतदान पथकांना जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत २५ एप्रिल रोजी नेऊन सोडणे व २६ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना परत घेऊन येण्यासाठी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकूण २३० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) १९८ बसेसचा समावेश असल्याने दोन दिवस प्रवाशांची अडचण होणार आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात म्हणजे २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी अंतिम टप्प्यात असून, इव्हीएमवर मतपत्रिका सिलिंग करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ५६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. स्टाँगरूममध्ये ठेवलेले ईव्हीएम युनिट यादृच्छिकरण पद्धतीने वितरीत करण्यात येणार आहेत. 

मतदानापूर्वी प्रशासनाने सर्वच तयारी पूर्ण केली असून, निवडणुकीच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी २००, तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी ११० अशा एकूण ३१० बसेसची मागणी करण्यात आली होती. यापैकी अकोला जिल्ह्यासाठी १९८ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय बसेसची व्यवस्थाअकोला पूर्व : ५०अकोला पश्चिम : १३अकोट : २६बाळापूर : ५४मूर्तिजापूर : ५५

प्रवाशांचे होणार हालनिवडणूक कामासाठी मतदान पथकातील कर्मचारी व इतरांना साहित्य ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बससह इतर खासगी बसची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या एक दिवस आधी व निवडणुकीच्या दिवशी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. वाहतुकीसाठी कमी साधने उपलब्ध राहणार असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसेल.

टॅग्स :Akola Bus Standअकोला बस स्थानकAkolaअकोलाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४