शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८,३७४ बीजोत्पादकांना भाव फरकापोटी १८ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 10:53 IST

Mahabeej News : राज्यातील ८,३७४ बीजोत्पादकांच्या खात्यात १८ कोटी ७९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमहाबीजकडून रकमेचे वाटप उर्वरित रकमेची शासनाकडे मागणी

- सागर कुटे

अकोला : महाबीजकडून बीजोत्पादकांना किमान आधारभूत किंमत व कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारित मूळ दर यामधील फरकाची रक्कम देण्यात येते. यावर्षी राज्यातील ८,३७४ बीजोत्पादकांच्या खात्यात १८ कोटी ७९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रकमेची शासनाकडे मागणी केली असल्याचे ‘महाबीज’कडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून बियाणांसाठी शेतकऱ्यांकडून तूर, हरभरा, करडई, मूग खरेदी केली जाते. खरीप व रब्बी हंगामात हा बीजोत्पादन प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पात शेतकऱ्यांना बाजार समितीत असलेले त्यावेळचे दर आणि शासनाने घोषित केलेल्या किमान आधारभूत किमतीमधील तफावत रक्‍कम नंतर दिली जाते. त्यासाठी ‘महाबीज’कडून शासनाला प्रस्ताव पाठविला जातो. या दोन किमतीमधील तफावत ही बोनस म्हणून शेतकऱ्यांना मिळते. त्यानुसार महाबीजच्या राज्य व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बियाणांसाठी फरकाची रक्कम म्हणून २५ कोटी ७० लाख रुपये रक्कम अदा करणे आहे. यातील १८ कोटी ७९ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे.

६ कोटी ९१ लाख देणे बाकी!

राज्यातील बहुतांश बीजोत्पादकांना भाव फरकापोटी रक्कम अदा करण्यात आली आहे; परंतु अद्यापही ६ कोटी ९१ लाख रुपये रक्कम देणे बाकी आहे. या रकमेसाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

 

२५ टक्के अधिक रकमेचा समावेश

शासन धोरणानुसार बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे दर पडल्यास हमीभाव गृहीत धरून त्यात २५ टक्के अधिक रकमेचा समावेश करून शेतकऱ्यांना फरकाची रक्कम बियाणे महामंडळाला द्यावी लागते.

बीजोत्पादकांना दिलेली रक्कम

१८ कोटी ७९ लाख

एवढ्या शेतकऱ्यांना रक्कम अदा

८,३७४

गतवर्षी हमीदरापेक्षा कमी मोबदला

गतवर्षी बाजार समित्यांमध्ये शेत मालाचे दर पडल्याने हरभरा बीजोत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या हमीदरापेक्षा कमी मोबदला मिळाला होता. त्यात राज्यात हरभरा, तूर, करडई व मुगाचे बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होता.

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोलाFarmerशेतकरी