शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १७९ उमेदवारी अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:19 IST

अकोला : जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी, अशा ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवारपर्यंत १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देकापशी रोड व मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि सातही तालुक्यांतील ९४ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवारपर्यंत १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.काही सदस्य पदांसाठी आणि आठ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

अकोला : जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी, अशा ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवारपर्यंत १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील कापशी रोड व मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि सातही तालुक्यांतील ९४ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. त्यामध्ये कापशी रोड ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १० फेबु्रवारीपर्यंत मुदत होती, तर घुंगशी या एका ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी आॅनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, १२ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत होती. त्यामध्ये घुंगशी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी १५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.घुंगशी ग्रा.पं.साठी असे दाखल झाले अर्ज !मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० उमेदवारी अर्र्ज दाखल झाले. त्यामध्ये सरपंच पदासाठी पाच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले.९४ ग्रा.पं.च्या पोटनिवडणुकांसाठी असे दाखल झाले उमेदवारी अर्ज !तेल्हारा - ३२अकोट- २०मूर्तिजापूर - १३अकोला - २५बाळापूर - २०बार्शीटाकळी - ३४पातूर -  १५....................................एकूण १५९आठ सरपंच पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज नाही!९४ ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी घेण्यात येत असलेल्या पोटनिवडणुकांमध्ये १५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असले, तरी काही सदस्य पदांसाठी आणि आठ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत