शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभराची मुदत देऊनही अकोला जिल्ह्यातील १७२ शाळांची संच मान्यतेकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:12 IST

अकोला : मॅन्युअलप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत संच मान्यता करून घेणे आवश्यक असतानाही १७२ शाळांनी त्याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. सोमवारपर्यंत सर्वच प्राथमिक शाळांना संच मान्यता करण्यासाठी मुदत दिली होती; परंतु ही मुदत उलटून गेल्यानंतरही शाळांनी संच मान्यता करून घेतली नाही. त्यामुळे ही जबाबदारी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांची राहील आणि ...

ठळक मुद्दे २0१७ व १८ साठीच्या संच मान्यतेसाठी शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळांना गत महिनाभरापासून सूचना देण्यात आल्या होत्याअकोला पंचायत समिती अंतर्गत येणाºया जवळपास १७२ प्राथमिक शाळांनी संच मान्यतेचे प्रस्ताव शाळा व मुख्याध्यापकांकडून प्रलंबित असल्याचे समोर आले.पुन्हा संच मान्यतेसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी स्पष्ट केले.

अकोला : मॅन्युअलप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत संच मान्यता करून घेणे आवश्यक असतानाही १७२ शाळांनी त्याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. सोमवारपर्यंत सर्वच प्राथमिक शाळांना संच मान्यता करण्यासाठी मुदत दिली होती; परंतु ही मुदत उलटून गेल्यानंतरही शाळांनी संच मान्यता करून घेतली नाही. त्यामुळे ही जबाबदारी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांची राहील आणि पुन्हा संच मान्यतेसाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी स्पष्ट केले.शिक्षण विभागाकडून प्राथमिक व माध्यमिक शाळांची संच मान्यता करून घेण्यात येते. २0१७ व १८ साठीच्या संच मान्यतेसाठी शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळांना गत महिनाभरापासून सूचना देण्यात आल्या होत्या आणि १५ जानेवारीपर्यंत संच मान्यता पूर्ण करून घेण्यास बजावले होते; परंतु अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाºया जवळपास १७२ प्राथमिक शाळांनी संच मान्यतेचे प्रस्ताव शाळा व मुख्याध्यापकांकडून प्रलंबित असल्याचे समोर आले. दरवर्षी शाळांना संच मान्यता पूर्ण करून घेण्यासाठी शाळा, शाळेतील शिक्षकांचे पदे, रिक्त पदे, आरक्षण, विद्यार्थ्यांची पटसंख्या यासह इतर माहिती द्यावी लागते. परंतु, अनेक शाळा संच मान्यतेचे प्रस्ताव पाठविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या शाळांनी, त्यांची संच मान्यता पूर्ण न केल्यामुळे याची जबाबदारी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांची राहील आणि संच मान्यतेसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही किंवा तशा राज्य शिक्षण विभागाकडून सूचनादेखील आलेल्या नाहीत, असेही शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी स्पष्ट केले.विद्यार्थ्यांना आधार कार्ड क्रमांकातून सूटशासनाने संच मान्यतेच्या माध्यमातून होणारी दिशाभूल थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक संच मान्यतेमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले होते; परंतु विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यामुळे संच मान्यतेमध्ये त्यांची संख्या समाविष्ट करताना शिक्षकांना अडचणी येत होत्या. तसेच विद्यार्थी संख्या संचमान्यतेमध्ये दिसत नसल्याने, अनेक शाळांमधील शिक्षकांवर अतिरिक्त ठरण्याचे संकट येत होते. याबाबत शासनदरबारी शिक्षक संघटनांनी आवाज उठवून शासनाला संचमान्यतेमधून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांकाची अट रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार यंदाच्या संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक समाविष्ट न करण्याची सूट दिली आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरSchoolशाळा