शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यातील २६१ युवकांना व्यवसायासाठी १७ कोटींचे कर्जवाटप

By atul.jaiswal | Updated: September 19, 2023 14:49 IST

योजनेतून नागरिकांना उद्योग व व्यवसाय करण्याची संधी

अतुल जयस्वाल, अकोला: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक युवकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे आतापर्यंत जिल्ह्यातील २६१ लाभार्थ्यांना एकूण१६ कोटी ९६ लाख ८३ हजार ९१३ रुपये कर्जवाटप करण्यात आले असून, त्यांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी मदत झाली आहे.

महामंडळातर्फे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यात युवक-युवतींना व्यवसायासाठी सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास कर्जावरील व्याजाचा परतावा महामंडळाकडून केला जातो. त्यामुळे व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून मदत मिळते.आतापर्यंत या योजनेत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून विविध युवकांनी घेतलेल्या कर्जावर १ कोटी ६३ लाख ८२ हजार ६९० रकमेचा व्याज परतावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, चालू वर्षात अकोला जिल्ह्यात ३७ लाभार्थ्यांना ३ कोटी १८ लक्ष २० हजार ८२९ रुपये इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रोहित पाटील यांनी दिली.

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे राबविण्यात आलेल्या या योजनेतून मराठा समाजातील नागरिकांना उद्योग व व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या कर्जाच्या माध्यमातून पोल्ट्री व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मेडिकल, कृषी सेवा केंद्र, हॉटेल, मालवाहतूक वाहने, ट्रॅक्टर, किराणा दुकान, फुटवेअर, टेलरिंग दुकान असे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळते.

टॅग्स :Akolaअकोला