अकोला जिल्ह्यात लवकरच १६५ नवीन पेट्रोल पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 02:01 PM2018-12-09T14:01:10+5:302018-12-09T14:01:22+5:30

अकोला : पेट्रोल आणि डीझलची मागणी दरवर्षी ४ ते ८ टक्क्यांनी वाढत असल्याने पेट्रोलियम मंत्रालयाने देशभरात ५५६४९ नवीन पेट्रोल पंप उभारले जाणार आहेत.

 165 new petrol pumps soon in Akola district | अकोला जिल्ह्यात लवकरच १६५ नवीन पेट्रोल पंप

अकोला जिल्ह्यात लवकरच १६५ नवीन पेट्रोल पंप

Next

अकोला : पेट्रोल आणि डीझलची मागणी दरवर्षी ४ ते ८ टक्क्यांनी वाढत असल्याने पेट्रोलियम मंत्रालयाने देशभरात ५५६४९ नवीन पेट्रोल पंप उभारले जाणार आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात १६५ नवीन पेट्रोल पंपांचा समावेश आहे. आॅनलाइन झालेल्या कार्यप्रणालीच्या संधीचा सर्वसामान्य लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतून करण्यात आले. पत्रकार परिषदेला एचपी, भारत, इंडियन आॅइल या तिन्ही कंपन्यांचे परिसरातील अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठी पेट्रोल पंप देण्याची प्रक्रिया आरक्षित आहे. सोबतच इतर आरक्षणही लागू आहे. एकूण एक, दोन आणि तीन ग्रुप असून, त्यात सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, ज्याच्याकडे स्वत:ची मोक्याची जागा आहे, असे व्यक्ती अर्ज करू शकतात. आॅनलाइन प्रक्रियेमुळे सर्व प्रक्रिया पारदर्शक असून, लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे या कंपनीच्या पदाधिकाºयांनी आवाहन केले.
पेट्रोलवर तीन टक्के आणि डीझलवर २.६० टक्के कमिशन प्रतिलीटर मागे कंपनीकडून डीलरला दिले जाते. त्यामुळे सेलवर नफा अवलंबून आहे. सर्वसामान्य लोकांना या प्रवाहात सहभागी करून घेण्याचे निर्देश मंत्रालयाचे असल्याने आम्ही पत्रकार परिषदा घेऊन ही जनजागृती करीत असल्याचेही या अधिकाºयांनी बोलताना सांगितले. शहरासह ग्रामीण भागातही हे पट्रोल पंप दिले जाणार असल्याने लोकांनी जाहिराती आणि शासनाच्या पोर्टलवरून माहिती घ्यावी, असेही या अधिकाºयांनी सांगितले. याप्रसंगी प्रमोद दंडारे, गणपती भट आणि इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

*भेसळ व तक्रारीसाठी २४ तास सेवा
पेट्रोल पंपांवर भेसळ होत असल्याची किंवा पेट्रोल कमी मिळत असल्याची शंका वाटत असल्यास नागरिकांनी कंपनीच्या सेल्स अधिकाºयांचे क्रमांक परिसरात शोधावे, पेट्रोल पंप मालकास मागावे आणि त्याची तक्रार नोंदवावी, त्याची दखल घेतल्या जाईल. ही सेवा २४ तास सुरू असते, असेही येथे अधिकारी बोलले.

 

Web Title:  165 new petrol pumps soon in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.