शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात १६२ मध्यम, ४३ तीव्र श्रेणीची कुपोषित बालके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:26 IST

जिल्ह्यात १६२ मध्यम, तर ४३ तीव्र श्रेणीतील कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचे स्वप्न बघितले जात असले, तरी कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात कुपोषित बालके आढळून येत आहेत. जुलै महिन्यात जिल्ह्यात १६२ मध्यम, तर ४३ तीव्र श्रेणीतील कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे.कुपोषण मुक्तीसाठी राज्य स्तरावर अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना पोषण आहार पुरविल्या जात आहे; मात्र तरीदेखील जिल्ह्यात काही भागात कमी अधिक प्रमाणात कुपोषित मुले आढळून येत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात जुलै महिन्यात २०५ मुलं कुपोषित श्रेणीत आढळून आले आहेत. यामध्ये १६२ मुलं मध्यम, तर ४३ मुलं तीव्र कुपोषित श्रेणीतील आहेत. जुलै महिन्याच्या अहवालानुसार, सर्वाधिक कुपोषित बालकांची नोंद अकोला शहर व अकोला ग्रामीणमध्ये करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, अकोट, तेल्हारा तहसील येथे कुपोषीत बालक आढळून आले आहे. सरकारकडून योजना राबविल्या जात असल्या तरी त्या प्रभावी ठरत नाहीत.

लॉकडाऊनच्या काळात पोषण आहार पुरविल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी कुपोषणाचा आकडा यामधील फोलपणा स्पष्ट करतो.अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांपर्यंत पोषण आहार पोहोचविल्या जातो. लॉकडाऊनच्या काळातही मोबाइलच्या माध्यमातून यंत्रणा या बालकांच्या संपर्कात होती.- विलास मारसाळे, महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य