15 buses of Akola city bus service seized by authority | अकोला शहर बससेवेच्या १५ बस जप्त
अकोला शहर बससेवेच्या १५ बस जप्त

अकोला : शहर बससेवेसाठी कंत्राट दिलेल्या श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी ज्या बँकेकडून कर्ज घेऊन १५ बस खरेदी केल्या होत्या, त्याची नियमित परतफेड न केल्याने या बस बँकेने सोमवारी जप्त केल्या आहेत. त्यामुळे शहर बससेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
शहर बससेवेसाठी श्रीकृपा ट्रॅव्हल्स आणि मनपात करार झाल्यानंतर वाशिम अर्बन बँकेकडून या १५ बस खरेदी करण्यासाठी एक ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार १५ बस शहर बससेवेसाठी खरेदी करण्यात आल्या. या बसद्वारे शहरात सेवाही पुरविण्यात येत असताना काही महिन्यांपासून श्रीकृपा ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी बँकेची परतफेड नियमित केली नाही. त्यामुळे बँकेने विधिज्ञामार्फत मनपा व श्रीकृपा ट्रॅव्हल्स यांना नोटीस देऊन थकीत रकमेचा भरणा करण्याची मागणी केली; मात्र दोघांनीही तब्बल २५ लाख रुपयांची थकीत रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविल्याने बँकेने या १५ बस जप्त केल्या आहेत.

 


Web Title: 15 buses of Akola city bus service seized by authority
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.