शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पातुरातील ‘कोरोना’ संदिग्धांसाठी १४८ खाटांचा विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 10:42 IST

पातूर येथील वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी १४८ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत.

शिर्ला : पातुरातील सात ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या वस्तीतील संदिग्ध आढळून येणाऱ्यांसाठी १४८ खाटांचे वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालय उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्रशासकीय अधिकारी राहुल खंडारे यांनी ‘लोकमत’ला दिली.पातूर नगर परिषद आणि शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील मुजावरपुरा, मोमीनपुरा, काशीदपुरा, बादशहा नगर, गुलशन कॉलनी या शंभर टक्के ‘सील’ केलेल्या वस्तीतील नागरिकांची आरोग्य तपासणी चाळीस पथक, दहा डॉक्टर आणि दहा सुपरवायझर यांच्या माध्यमातून आजपासून सुरू झालेली आहे. तपासणीदरम्यान संसर्गाची लक्षणे आढळून येणाºया नागरिकांना पातूर येथील वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी १४८ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. अधिष्ठाता गायत्री मावळे यांच्या मार्गदर्शनात आठ डॉक्टर, सहा नर्स यांच्यासह शासकीय वैद्यकीय विभागाचा आवश्यकतेनुसार उपलब्ध राहणार आहे.दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले की, पातूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आल्याने सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. संदिग्धांची संख्या अधिक वाढल्यास पातूर येथील आयुर्वेद महाविद्यालय त्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. यादरम्यान नागरिकांनी आपल्या घरातच राहावे.नितीन देशमुख यांनी दिले १० लाख रुपयेआमदार नितीन देशमुख यांनी स्थानिक विकास निधी कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत कोविड-१९ च्या अनुषंगाने उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदी करण्याकरिता नगर परिषद पातूरकरिता दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी फेस मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर, याव्यतिरिक्त कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सामग्री यंत्र आणि साहित्य खरेदी करण्यासाठी वापरावा, अशी सूचना आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPaturपातूर