शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ११ ट्रेडिंग कंपन्यांना एक काेटी ८७ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 11:11 IST

Akola APMC News: शिवकुमार रुहाटीया आणि शेख जावेद शेख हुसेन कादरी या दाेघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनर्मदा साॅल्वेक्स व लक्ष्मी सेल्स कॉर्पोरेशनने लावला चुनादाेन्ही कंपन्यांचे संचालक गजाआड

अकाेला : अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तब्बल ११ ट्रेडिंग कंपन्यांकडून सुमारे एक काेटी ८७ लाखांचे साेयाबीन खरेदी केल्यानंतर त्याची रक्कम न देता हात वर करणाऱ्या नर्मदा साॅल्वेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचा अधिकृत प्रतिनिधी लक्ष्मी सेल्स कार्पाेरेशन या दाेन कंपन्यांच्या संचालकांविरुध्द रामदास पेठ पाेलिसांनी शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात नर्मदा साॅल्वेक्सचा संचालक शिवकुमार रुहाटीया आणि लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशनचा संचालक शेख जावेद शेख हुसेन कादरी या दाेघांना अटक करण्यात आली आहे. गाैरक्षण राेडवरील सहकार नगर येथील रहिवासी सतीश शांतीलाल जैन यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वडिलाेपार्जित अरिहंत ट्रेडिंग कंपनी नावाचे अडत दुकान आहे. त्यांच्याकडून दरवर्षी नर्मदा साॅल्वेक्सचा संचालक शिवकुमार रुहाटीया आणि त्यांचाच अधिकृत प्रतिनिधी असलेला लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशनचा संचालक शेख जावेद शेख हुसेन कादरी साेयाबीन खरेदी करतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील १० अडत्यांकडून त्यांनी तब्बल एक काेटी ८७ लाख ७८ हजार ४९१ रुपयांचे साेयाबीन एप्रिल व मे महिन्यात खरेदी केले. त्यानंतर काेराेनाचे संकट वाढल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले. या कारणामुळे काही दिवस त्यांनी विकलेल्या साेयाबीनचे पैस मागण्यास वेळ केला. मात्र आता ११ अडत्यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली असता लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशनचा संचालक शेख जावेद शेख हुसेन कादरी याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मुख्य खरेदीदार नर्मदा साॅल्वेक्सचा संचालक शिवकुमार रुहाटीया यास पैशाची मागणी केली असता त्यानेही टाळाटाळ केली. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार सतीश जैन यांनी रामदास पेठ पाेलीस ठाण्यात केली. पाेलिसांनी या प्रकरणात दाेन्ही आराेपींसह त्यांच्या साथीदारांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात शिवकुमार रुहाटीया व शेख जावेद शेख हुसेन कादरी या दाेघांना अटक करण्यात आली असून त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़

या अडत्यांची फसवणूक

  1. अरिहंत ट्रेडिंग कंपनी १० लाख ६९ हजार ९५२ रुपये
  2. अजय ट्रेडर्स            २९ लाख ८८ हजार ६११ रुपये
  3. सत्यजीत ट्रेडिंग १५ लाख ३५ हजार १०७ रुपये
  4. आशीर्वाद ट्रेडिंग ३९ लाख ०२ हजार २३२ रुपये
  5. राेशन ट्रेडिंग ३७ लाख ०५ हजार ६४६ रुपये
  6. हनुमान ट्रेडिंग २ लाख ४१ हजार ७५६ रुपये
  7. मालानी ट्रेडिंग ९ लाख ५० हजार ५३३ रुपये
  8. ए. एम. शिंगरूप ७ लाख ४६ हजार ७०२ रुपये
  9. जैन ट्रेडिंग १ लाख ६१ हजार ९९२ रुपये
  10. पुंडलिक ट्रेडर्स १५ लाख २९ हजार ७५७ रुपये
  11. मानकर ॲण्ड सन्स १९ लाख ४६ हजार २०३ रुपये

 

 

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांची फसवणूक करणाऱ्या दाेन कंपन्यांविरुध्द फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवकुमार रुहाटीया आणि शेख जावेद शेख हुसेन कादरी यास अटक करण्यात आली आहे. या दाेन्ही आराेपींसह त्यांच्या साथीदारांचाही लवकरच शाेध घेण्यात येणार आहे़

- विलास पाटील, प्रभारी ठाणेदार, रामदास पेठ पाेलीस स्टेशन, अकाेला

 

मध्यस्थी ठरली व्यर्थ

या प्रकरणात एका आमदारासह अनेक व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दाेन्ही कंपन्यांचे संचालक केवळ एक काेटी १० लाख रुपये देण्यास तयार झाले. यापेक्षा अधिक एकही रुपया देणार नसल्याची भूमिका या कंपन्यांनी घेतल्यामुळे मध्यस्थांनी आपसात करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर या प्रकरणात शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी