शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अवैध सावकारी प्रकरणातील अकराही जणांना जामीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:34 IST

बनावट दस्तऐवजाद्वारे आर्थिक व्यवहार करणे तसेच अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची लाखो रुपयांनी फसवणूक करणार्‍या शहरातील अकरा व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अकराही जणांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

ठळक मुद्दे अकराही जणांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होतीबनावट दस्तऐवजाद्वारे आर्थिक व्यवहार अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बनावट दस्तऐवजाद्वारे आर्थिक व्यवहार करणे तसेच अवैध सावकारीच्या माध्यमातून एका शेअर ब्रोकरची लाखो रुपयांनी फसवणूक करणार्‍या शहरातील अकरा व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर अकराही जणांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील अकरा जणांचा जामीन मंजूर केला. सुधीर कॉलनी येथील रहिवासी तसेच शेअर ब्रोकर अनुप गुलाबराव आगरकर नामक व्यक्तीने अनुप डोडियाकडून २३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या मोबदल्यासाठी ३३0 धनादेश अनुप आगरकरने डोडियाला दिले होते. कर्ज स्वरूपात घेतलेल्या २३ लाख रुपयांचे तब्बल ७८ लाख रुपये व्याजासह परतफेड करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर डोडियाने ३ ते ७ टक्के दरमहा दरशेकडा व्याजदराने अनुप आगरकरकडून रक्कम वसुली सुरू केली होती. एवढेच नव्हे, तर सदर ३३0 धनादेशांपैकी काही धनादेशाचा गैरवापर करीत ते धनादेश दीपक कृषी सेवा केंद्र, मराठा कृषी सेवा केंद्र, अटल ट्रेडर्स, कोरपे ब्रदर्स, राहुल राठी, राकेश राठी, आशिष माहेश्‍वरी, ऋषभ  मार्केटिंग, अनुपकुमार आशिषकुमार, जी. एम. ट्रेडिंग यांना देऊन  बनावट दस्तऐवजाद्वारे वटविण्यात आले होते. या प्रकरणाची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे झाल्यानंतर या शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी तपास करून सदर प्रतिष्ठानांसह ११ व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अकराही व्यापार्‍यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने अकराही व्यापार्‍यांना जामीन मंजूर केला.

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हा