शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम, मूल्यमापनाच्या तासिकांचे नियोजन तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:44 IST

शालेय स्तरावर अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनियोजनामध्ये विद्यार्थ्यास तीन भाषा विषय असणे अनिवार्य केले आहेत. दहावीचे अंतिम मूल्यमापन १००/५० गुणांच्या लेखी परीक्षेनुसार होणार आहे.

अकोला : २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आल्यावर पुनर्रचित अभ्यासक्रम, विषययोजना, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शालेय स्तरावर अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे.शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी नव्याने पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात आल्यावर, दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रम, मूल्यमापनाच्या तासिकांचे नियोजनामध्ये विद्यार्थ्यास तीन भाषा विषय असणे अनिवार्य केले आहेत. त्याप्रमाणे प्रथम भाषा, द्वितीय भाषा व तृतीय भाषेचा समावेश आहे. १०० गुणांच्या भाषा विषयामध्ये १०० गुण लेखी परीक्षा, तर ५० गुणांच्या भाषा विषयासाठी ५० गुण लेखी परीक्षा, तर दोन्ही सत्र परीक्षेत स्वतंत्रपणे ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन अशी विभागणी करण्यात आली. दहावीचे अंतिम मूल्यमापन १००/५० गुणांच्या लेखी परीक्षेनुसार होणार आहे. दहावीसाठी मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी (तृतीय) ऐवजी इंग्रजी (प्रथम) भाषा अभ्यासण्याची पर्यायी सोय उपलब्ध केली आहे. प्रथम भाषा इंग्रजी की मराठी, हे निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना दिले आहे. या भाषांसह इतर भाषांसाठी कृतिपत्रिका तयार करून मूल्यमापन करावे. गणित भाग १ व २ (बीजगणित व भूमिती) हा विषय १०० गुणांचा असून, या १०० गुणांमध्ये ८० गुण लेखी परीक्षा व २० गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी दिले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची दोन स्वतंत्र पाठ्यपुस्तके असून, लेखी परीक्षेसाठी पेपर १ व २ साठी प्रत्येकी ४० गुणाच्या स्वतंत्र्य प्रश्नपत्रिका असतील. उर्वरित २० गुण प्रात्यक्षिकाचे राहतील. सामाजिक शास्त्रे विषयामध्ये इतिहास, राज्यशास्त्र मिळून एक आणि भूगोल विषय मिळून एक अशी दोन पुस्तके आहेत. इतिहासाला ४०, राज्यशास्त्र २० गुण व भूगोल ४०, असे एकूण १०० गुणांची परीक्षा राहील. तसेच एनएसक्युएफचे व्यवसाय विषयाला ३० गुण लेखी परीक्षा आणि ७० गुण प्रात्यक्षिक परीक्षेप्रमाणे आहेत. या सर्व विषयांनुसार शालेय स्तरावर अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दहावीचा पुनर्रचित अभ्यासक्रम हा कृतींवर आधारित आहे. शाळांना दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी दहावीचा अभ्यासक्रम, मूल्यमापन आणि तासिकांचे नियोजन केले आहे.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक, जि.प. अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणexamपरीक्षा