शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील १०५ कुख्यात आरोपी तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:32 IST

अकोला: मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलाद या उत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी घेत जिल्ह्यातील १०५ कुख्यात गुंडांना एक दिवस दोन दिवस ते थेट एक वर्ष आणि सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे.

अकोला: मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलाद या उत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी घेत जिल्ह्यातील १०५ कुख्यात गुंडांना एक दिवस दोन दिवस ते थेट एक वर्ष आणि सहा महिन्यांसाठी तडीपार केले आहे. यामध्ये शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी गुडांच्या तडीपारीसाठी पाठपुरावा करून त्यांना तडीपार केले.ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव महसूल खात्याकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी पाठपुरावा करीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ९१ गुंडांना ईदच्या निमित्त म्हणजेच २० आणि २१ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांसाठी तडीपार केले आहे. तर शहरातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड असलेल्या १४ आरोपींनाही तब्बल तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा आदेश मंगळवारी देण्यात आले असून, या तडीपारांना जिल्ह्यातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगेश गोवर्धन वानखडे, विलास ऊर्फ झिपºया सिद्धार्थ शिरसाट, राजेश ऊर्फ राजेश्वर ऊर्फ राजू बाजीराव राऊत तर जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंकुश अरुण केवतकर, स्वप्निल ऊर्फ लल्या अशोक पालकर रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शोएबखान ऊर्फ मुन्ना डॉन ऊर्फ इलीयास खान आणि आकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमिरखान ऊर्फ बबलू अयुब खान या सात आरोपींना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर मो. नाजीम ऊर्फ मो. नादीम मो. हुसेन आणि शेख हुसेन ऊर्फ कालू शेख रहेमान या दोन आरोपींना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तर ९४ आरोपींना २० आणि २१ नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.-----------------------------------कोटशहरात ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने गुंड प्रवृत्तीच्या युवकांना दोन दिवसांसाठी तडीपार केले आहे. तर वादग्रस्त असलेल्या १४ आरोपींना विशेष अधिकार वापरत एक वर्षासाठी आणि सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यासोबतच आणखी काही गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार असून, या गुंडांकडून चूक झाल्याचे आढळताच त्यांना एक वर्ष आणि सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात येईल.उमेश माने पाटीलशहर पोलीस उपअधीक्षक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस