राज्यात सरासरीच्या १०२ टक्के पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:46 PM2018-06-01T13:46:45+5:302018-06-01T13:46:45+5:30

अकोला : राज्यात यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होईल पण, कृषी हवामान शास्त्र मॉडेलनुसार वाºयाचा वेग कमी आढळून आल्याने जून, जुलै तसेच आॅगस्ट महिन्यात सात जिल्ह्यांसह तीन ते चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

102 percent rain in the state! | राज्यात सरासरीच्या १०२ टक्के पाऊस!

राज्यात सरासरीच्या १०२ टक्के पाऊस!

googlenewsNext
ठळक मुद्देजून, जुलै व आॅगस्ट महिन्यात अकोल्यासह पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, सिंदेवाही व परभणी येथे पावसाचा मोठा खंड पडेल.पश्चिम विदर्भात अकोला येथे जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरी ६८३.७ मि.मी., तर याच कालावधीतील साधारण ६५५ मि.मी. ९६ टक्के पाऊस होईल. मध्य विदर्भ विभागात १०२ टक्के पावसाची शक्यता असून, नागपूर सरासरी व साधारण ९५८ मि.मी म्हणजेच १०० टक्के पाऊस होईल.

- राजरत्न सिरसाट

अकोला : राज्यात यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होईल पण, कृषी हवामान शास्त्र मॉडेलनुसार वाºयाचा वेग कमी आढळून आल्याने जून, जुलै तसेच आॅगस्ट महिन्यात सात जिल्ह्यांसह तीन ते चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
यावर्षीचा १ जून ते सप्टेबरपर्यंतचा पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. कमाल तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वाºयाचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी, या निकषावर त्यांनी हा अंदाज वर्तविला. मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल पण, वाºयाचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात अकोल्यासह पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, सिंदेवाही व परभणी येथे पावसाचा मोठा खंड पडेल. दापोली, पाडेगाव व नागपूर भागात खंडित वृष्टी राहील. तसेच कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड, असे हवामान राहणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.
दरम्यान, पश्चिम विदर्भात अकोला येथे जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरी ६८३.७ मि.मी., तर याच कालावधीतील साधारण ६५५ मि.मी. ९६ टक्के पाऊस होईल. मध्य विदर्भ विभागात १०२ टक्के पावसाची शक्यता असून, नागपूर सरासरी व साधारण ९५८ मि.मी म्हणजेच १०० टक्के पाऊस होईल. यवतमाळला सरासरी ८८२, तर साधारण ९२६ मी.मि. १०५ टक्के पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ विभागात १०५ टक्के पावसाची शक्यात असून, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे सरासरी १९९१ मि.मी. साधारण १२ ५० मि.मी. असा १०५ टक्के पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा विभागात १०२ टक्के पावसाचा अंदाज आहे. परभणी येथे सरासरी ८१५ , साधारण ८३१ मि.मी. म्हणजेच १०२ टक्के पावसाची शक्यता आहे. कोकण विभागात १०७ टक्के पावसाची शक्यता आहे, तर दापोली येथे सरासरी ३३३९ मि.मी., तर साधारण ३५९६ मि.मी. १०७ टक्के पाऊस होईल. उत्तर महाराष्टÑात १०३ टक्के पावसाचा अंदाज आहे. यात नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सरासरी ४३२, तर साधारण ४६० मि.मी. १०६ टक्के, धुळे येथे सरासरी ४८१, तर साधारण ५०० मि.मी. १०३ टक्के पाऊस होईल. जळगाव जिल्ह्यात सरासरी ६३९, तर साधारण ६४० मि.मी. १०० टक्के पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात १०० टक्के अंदाज वर्तविण्यात आला असून, कोल्हापूर सरासरी ७०६ एकूण ७३० मि.मी. १०३ टक्के पावसाचा अंदाज आहे. कराड येथे सरासरी ५७० मि.मी. पाऊस होईल. पाडेगाव सरासरी व साधारण ३६० मि.मी. १०० टक्के, सोलापूर सरासरी ५४३ साधारण ५५० मि.मी. १०० टक्के, राहुरी सरासरी व साधारण ४०६ मि.मी. १०० टक्के, तर पुणे येथे सरासरी ५६६ साधारण ५७८ मि.मी. १०२ टक्के पावसाची शक्यता आहे.


  राज्यात यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पावसाची शक्यता आहे पण, वाºयाचा वेग कमी आढळल्याने काही ठिकाणी जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे.
डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा सदस्य संशोधन परिषद स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

 

Web Title: 102 percent rain in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.