शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
9
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
10
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
11
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
12
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
13
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
14
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
15
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
16
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
17
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
18
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
19
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
20
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

कुपोषणाचे दुष्टचक्र, अकोला जिल्ह्यात शंभरावर बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 13:03 IST

अकोला: कुपोषणावर मात करण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात; मात्र उदासीन प्रशासन अन् पालकांच्या दुर्लक्षामुळे कुपोषणावर मात करण्यात अपयश येत आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून १७२ तीव्र कुपोषित बालके आढळून आली असून, यामध्ये बाळापूर तालुक्याची स्थिती चिंताजनक आहे.

अकोला: कुपोषणावर मात करण्यासाठी प्रशासनस्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जातात; मात्र उदासीन प्रशासन अन् पालकांच्या दुर्लक्षामुळे कुपोषणावर मात करण्यात अपयश येत आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून १७२ तीव्र कुपोषित बालके आढळून आली असून, यामध्ये बाळापूर तालुक्याची स्थिती चिंताजनक आहे.महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात शहरी व ग्रामीण दोन्ही गटात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण दर महिन्याला केले जाते. सर्वेक्षणात जास्तीत जास्त बालके साधारण वजनाची आढळली. शंभरच्या वर बालके कुपोषणाच्या दुष्टचक्रात अडकल्याचे समोर आले आहे. मध्यम कमी व तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची तपासणी केली असता ४३ बालके अतितीव्र कुपोषित आढळून आले, २६२ बालके मध्यम तीव्र कुपोषित आढळली. बाळापूर तालुक्यात कुपोषणाची स्थिती चिंताजनक असून, तालुक्यात सर्वाधिक १५ बालके ही अतितीव्र, तर ३७ बालके ही मध्यम तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आहेत. त्यावर प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरत आहे.उंचीनुसार कुपोषित बालकांची स्थिती (ग्रामीण भाग)तालुका मध्यम तीव्र अतितीव्रअकोला ग्रामीण १ २६ ३अकोला ग्रामीण २ २३ ६बार्शीटाकळी ३१ १अकोट ६२ ४तेल्हारा ४९ ६बाळापूर ३७ १५मूर्तिजापूर १० ०पातूर २४ ८-----------------------------एकूण २६२ ४३शहरी भाग (वजनानुसार)शहरी भागामध्ये प्रकल्प एक मध्यय अकोला शहर महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ९० तीव्र कुपोषित बालके आढळून आले. तर प्रकल्प दोनमध्ये पातूर, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा आणि खदान, कृषिनगर (अकोला शहर) या भागात ३९ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे समोर आले.यंत्रणेसमोरील समस्या

  • कुपोषित बालकांना ‘एनआयसीयू’कक्षात भरती करण्यास टाळाटाळ.
  • ‘एनआयसीयू’कक्षात १४ दिवसांचा उपचार केवळ १० ते १५ टक्के बालकांवरच.
  • अनेक पालक खासगीत उपचार करतात; पण अनियमित.
  • पर्याप्त मनुष्यबळाचा अभाव.
  • एकात्मिक बाल विकास कार्यक्रमात वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज.

 

आरोग्य विभाग आणि एकात्मिक बाल विकास यांच्या समन्वयाने वर्षभर कुपोषित बालकांसाठी उपक्रम राबविले जातात; परंतु काही तांत्रिक अडचणी आणि पालकांच्या दुर्लक्षामुळे प्रत्यक्ष काम करताना अडचणींचा सामना करावा लागतो.- वी.पी. सोनोने, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प, शहरी

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिकHealthआरोग्य