शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:43 IST

एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला कु मारी माता बनविणाºया आरोपीस द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली.

अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी तसेच अनाथ असलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला कु मारी माता बनविणाºया आरोपीस द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यासोबतच आरोपीस १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे.अकोट फैलमधील रहिवासी एका १५ वर्षीय मुलीवर याच परिसरात रहिवासी असलेला आकाश सिद्धार्थ काटे याने बलात्कार केला. यामध्ये मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिला ३ आॅगस्ट २०१६ रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अकोट फैल पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे अकोट फैल पोलिसांनी पीडितेचे बयाण घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपी आकाश काटे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने सात साक्षीदार तपासल्यानंतर तसेच तिघांचेही डीएनए रिपोर्ट जुळल्याचा अहवाल आल्यानंतर आरोपी आकाश काटे याला पोस्को कायद्याच्या कलम ६ अन्वये दोषी ठरवित १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीस घटना घडल्यानंतर काही दिवसांतच अटक करण्यात आली होती; मात्र त्यानंतर ४ जानेवारी २०१७ रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आरोपी बाहेर असून, त्याला आता अटक करून कारागृहात नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. आनंद गोदे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार