शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर दुहेरी अपघातात १० जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 17:49 IST

कुरूम (अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर झालेल्या दुहेरी अपघातात १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ आॅक्टोबर रोजी घडली.

कुरूम (अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर झालेल्या दुहेरी अपघातात १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना १४ आॅक्टोबर रोजी घडली. प्रवासी घेऊन येत असलेल्या आॅटोला मधापुरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने सहा जण गंभीर जखमी झाले, तर हयातपूरजवळ टायर फुटल्याने भरधाव कार उटल्याने चार जण जखमी झाले.बडनेरा येथून प्रवासी घेऊन कुरूमला येत असलेल्या आॅटो क्र. एमएच २७ बीडब्ल्यू ०९११ ला मधापुरी फाट्यानजीक रमना शिवारात अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेमुळे आॅटो उलटून सहा जण गंभीर जखमी झाले. यामध्ये सुरेश माणिकराव कुरळकर (४५) अनिता सुरेश कुरळकर (३५), आकाश सुरेश कुरळकर (१५) रा. पिंपळखुटा ह. मु. पंचवटी अमरावती, अ.वसीम अ.मन्नान (२६), पूजा रंगराव गेबड (२०), आॅटोचालक सलीमखा बुरानखा (३५) सर्व रा. कुरूम यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच कुरूम चौकीचे हे.काँ. बाळकृष्ण नलावडे, पो.काँ. रामेश्वर कथलकर यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने स्थानिक प्रा.आ. केंद्रात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून सहाही जखमींना प्रा.आ. केंद्र कुरूमच्या रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचाराकरिता अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरा अपघात हयातपूरनजीक घडला. अकोलावरून अमरावतीकडे जाणारी कार क्र. एमएच ३० एटी १०१६ चे टायर फुटल्याने चार जण जखमी झाले. कारमधील जखमी हे अकोल्यातील रहिवासी असल्याचे समजते. त्यांची नावे कळू शकले नाहीत.

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा!राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातात वाढ झाली आहे. खड्ड्यांमुळे दुचाकींसह चारचाकी वाहनांचा अपघात होत असून, अनेकांना आपले प्राण गमावले आहेत, तर काही गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची तसेच खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात