शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात चलनातून बाद झालेल्या १० लाखांच्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 13:30 IST

अकोला - भारत सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतरही मोठया प्रमाणात या नोटा काही बडया उद्योजक व व्यापाऱ्यांकडे असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

ठळक मुद्देचलनातून बाद झालेल्या नोटा घेउन जात असलेल्या चार युवकांना शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने गुरुवारी महाकाली हॉटेलसमोर अटक केली.पथकाने या परिसरात पाळत ठेउन संशयास्पद हालचाल करीत असलेल्या सतीष तायडे याला ताब्यात घेतले.चारही आरोपींविरुध्द खदान पोलिस ठाण्यात स्पेसीफाइड बँक नोट सेशन आॅफ लायबिलीटी कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- सचिन राऊत अकोला - भारत सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतरही मोठया प्रमाणात या नोटा काही बडया उद्योजक व व्यापाऱ्यांकडे असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. तब्बल १० लाख रुपयांच्या एक हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा घेउन जात असलेल्या चार युवकांना शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने गुरुवारी महाकाली हॉटेलसमोर अटक केली.महाकाली हॉटेलसमोर शिवणी येथील रहिवासी सतीष महादेव तायडे हा एका दुचाकीमध्ये चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या १० लाख रुपयांच्या नोटा घेउन असल्याची माहिती शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकाला या परिसरात कार्यरत करून पाळत ठेवण्याचे सांगीतले. यावरुन पथकाने या परिसरात पाळत ठेउन संशयास्पद हालचाल करीत असलेल्या सतीष तायडे याला ताब्यात घेतले. त्याची दुचाकी जप्त करून झडती घेतली असता यामध्ये एक हजार रुपयांच्या एक हजार नोटा म्हणजेच तब्बल १० लाख रुपये जप्त केले. यावेळी सतीष तायडे याचे साथीदार आशीष पांडे, आलोक जोशी, पार्थ लोंडे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या चारही आरोपींविरुध्द खदान पोलिस ठाण्यात स्पेसीफाइड बँक नोट सेशन आॅफ लायबिलीटी कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील, परिविक्षाधील शहर पोलिस उपअधिक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनात राजु वाकोडे, विनय जाधव व संतोष गवई यांनी केली.आयकर व आरबीआयला माहितीशहर पोलिस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने १० लाख रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्या. त्यानंतर या प्रकरणाची माहिती आयकर व आरबीआयच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांच्याकडून या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यात येणार आहे. या कारवाईमूळे अद्यापही मोठया प्रमणात चलनातून बाद झालेलया नोटा अकोल्यात असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा