शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

‘स्क्रब टायफस’चे १० ‘कन्फर्म’, २३ संशयित रुग्ण!

By atul.jaiswal | Updated: September 8, 2018 13:17 IST

चार जिल्ह्यांमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत १० ‘कन्फर्म’, तर २३ संशयित रुग्णांची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे.

ठळक मुद्देआरोग्य सेवेच्या अकोला मंडळातील अकोला, अमरावती, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यात मात्र ‘स्क्रब टायफस’चा एकही रुग्ण नसल्याची नोंद आहे.

अकोला : डेंग्यू व इतर आजारानंतर आता ‘स्क्रब टायफस’ या कीटकजन्य आजाराचा संसर्ग वाढत असून, आरोग्य सेवेच्या अकोला मंडळातील अकोला, अमरावती, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये ६ सप्टेंबरपर्यंत १० ‘कन्फर्म’, तर २३ संशयित रुग्णांची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी आहे. विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यात मात्र ‘स्क्रब टायफस’चा एकही रुग्ण नसल्याची नोंद आहे.‘चिगर माईटस्’ या कीटकाच्या चावल्यामुळे होणाऱ्या ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळून येत असून, नागपूर, गडचिरोली, भंडारा व मध्य प्रदेशातील १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम विदर्भातही या आजाराने डोके वर काढले आहे. ‘स्क्रब टायफस’ची व्याप्ती वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाकडून कसोशीने प्रयत्न केले जात असतानाही आतापर्यंत अकोला, अमरावती, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये या आजाराचे १० ‘कन्फर्म’, तर २३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव रुई येथील एका महिलेचा मृत्यू स्क्रब टायफससदृश आजाराने झाल्याची नोंद आहे.‘ती’ महिला मध्य प्रदेशची‘स्क्रब टायफस’वर उपचार घेत असताना नागपूर ‘जीएमसी’मध्ये मृत्यू झालेली एक महिला अकोला जिल्ह्यातील असल्याची नोंद होती. शोध घेतला असता, ती महिला अकोल्यातील नव्हे, तर मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आले.महिलांची संख्या अधिक‘स्क्रब टायफस’ची लागण झालेल्या कन्फर्म व संशयित अशा एकूण ३३ रुग्णांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. यामध्ये २० महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे.‘स्क्रब टायफस’चे संशयित रुग्ण आढळून येत असले, तरी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्नरत आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.- डॉ. अभिनव भूते, सहायक संचालक, आरोग्य सेवा (हि.) अकोला.जिल्हा       कन्फर्म    संशयितअमरावती    ०८        ०४अकोला       ०१          ०६बुलडाणा     ०१        ००यवतमाळ   ००        १३वाशिम       ००       ००--------------------------------------------------एकूण      १०            २३

 

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीbuldhanaबुलडाणा