सिंदखेडराजा (बुलडाणा): किनगावराजाकडून देऊळगावराजा जात असलेल्या एका मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यामध्ये एक जण जागेवर ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १0 फेब्रुवारी रोजी रात्री ८.३0 वाजता किनागावराजा येथून दोन किमी अंतरावर असलेल्या गुर्हाळानजीक घडली.यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही ये थील संदीप फुल्लारे व आणखी एक जण एम.एच.२0 सी.एल. ५४६३ क्रमांकाच्या मोटारसायकलने किनगावराजाकडून देऊळगाव मही येथे जात होते. दरम्यान, किनगावराजा येथील गुर्हाळानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यामध्ये एक जण जागीच ठार झाला, तर संदीप फुल्लारे हा गंभीर जखमी झाला. त्याला जालना येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मृतकाची ओळख पटली नसून, वृत्त लिहिस्तोवर पोलीस तपास सुरू होता.
दुचाकी अपघातात १ ठार; १ जखमी
By admin | Updated: February 11, 2015 01:06 IST