शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

झिरो बजेट नैैसर्गिक शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 4:02 PM

झिरो बजेट नैैसर्गिक शेती कसणाऱ्या प्रणय गाडे या युवा शेतकºयाच्या मळ्यास भेट दिली. या शेतीला अध्यात्मिक शेती असेही म्हटले जाते.

शिवाजी पवारझिरो बजेट नैैसर्गिक शेती कसणाऱ्या प्रणय गाडे या युवा शेतक-याच्या मळ्यास भेट दिली. या शेतीला अध्यात्मिक शेती असेही म्हटले जाते. यामागील तत्त्वज्ञान प्रणयच्या तोंडून जाणून घेतले. विषमुक्त उत्पादन पद्धतीत राज्यभर आपला ठसा उमटविणा-या भैैरवनाथनगर (ता.श्रीरामपूर) येथील दिवंगत बापूसाहेब गाडे यांचा हा मुलगा. निव्वळ पैैसे कमवून देणारे हे मॉडेल नाही. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, जैववैैविध्यासह कार्बन क्रेडिट चळवळीवर बोलणारा हा अभ्यासू युवक गुगलवर केलेल्या शोधातून युरोपातील शेतीबाबतही बोलत होता.मारे पंधरा वर्षाहून अधिक काळ गाडे कुटुंबीय झिरो बजेट नैैसर्गिक शेती कसत आहे. बापूसाहेब गाडे यांनी शेतकºयांचा गट स्थापन केला होता. शेडनेट शेतीतून ढोबळी मिरचीचे उत्पादन घेणाºया जिल्ह्यातील पहिल्या काही मोजक्या शेतकºयांमध्ये त्यांचा समावेश होतो. मात्र शेतीचे भांडवलीकरण आणि ओघाने वाढलेला उत्पादन खर्च प्रत्यक्ष अनुभवयाला येत असल्याने बापूसाहेब हे पर्यायी व शाश्वत शेतीच्या शोधात होते. त्यातच त्यांची भेट सुभाष पाळेकर यांच्याशी झाली. हा काळ साधारणपणे २००२-०३ चा.वडिलांच्या निधनानंतर दोन-तीन वर्षापासून आजही हे कुटुंबीय मोठ्या चिकाटीने याच शेती पद्धतीने प्रयोग राबवत आहेत. त्यांच्या संपूर्ण पाच एकर क्षेत्रावर रासायनिक अथवा तथाकथित सेंद्रिय शेतीला जराही थारा दिला जात नाही. बहुतांशी जमीन ही उसाखालची आहे. ८६०३२ व नवविकसित ८००५ या वाणाची लागवड करतात. घरी गु-हाळ असल्याने वजनापेक्षा साखर उता-याला अधिक महत्त्व दिले जाते.आठ बाय दोन व पाच बाय दोन या आकारात एक डोळा पद्धतीने ते लागवड करतात. आठ बाय दोनकरिता एकरी अवघे दोन हजार डोळे लावले जातात. म्हणजेच फक्त ३२५ किलो वाण. एकरी चक्क दोन ते तीन टन उसाच्या वाणाचा आग्रह धरणा-या शेतक-यांच्या तोंडात मारण्याचाच हा प्रकार. उत्पादनही ६५ टनापर्यंत घेतले आहे.गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्यात विविध कृषी प्रदर्शनांमध्ये गाडे कुटुंबीय सहभाग घेतात. साई अमृत या ब्रँड नावाने ते झिरो बजेट नैैसर्गिक शेतीपासून निर्मित गुळाची विक्री करतात. त्याला जिल्ह्यातच ८० रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. साधारणपणे २० ते २५ टन गुळाची ते स्वत: विक्री करतात. काळाच्या ओघात त्यांनी स्वत: मालाला बाजार तयार केला आहे. उसात घेतलेल्या आंंतरपिकातूनही भरघोस उत्पन्न मिळते. चवळी, मूग, हरभरा यांची डाळ तयार करून घेत त्यांचीही विक्री केली जाते.प्रणय यांनी गावरान गायींचा मुक्त गोठा करण्याचे नियोजन केले आहे. श्रीरामपूर नॅचरलस या ब्रॅँड नावाने शेतकºयांच्या गटाचे विक्री केंद्र लवकर खुले होणार आहे. श्रीरामपूरकरांना विषमुक्त पालेभाज्या व कडधान्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी अवाजवी व अवास्तव दर आकारणार नाही. विक्रीतून किलोमागे एक रुपये सुभाष पाळेकर यांना चळवळीकरिता देऊ असे प्रणय याने सांगितले. निव्वळ पैैसे कमविण्याचा हेतू ठेवणाºया लोकांनी इकडे फिरकू नये. संयम आणि मेहनतीची तयारी असणारे युवक इथे तग धरतील. शेती उत्पादनात मेहनतीला शॉर्टकट मारण्याचा प्रकार हल्ली वाढला आहे. त्याबद्दल प्रणय यांनी चिंता व्यक्त केली. झिरो बजेट शेती ही एक जीवनशैैली आहे. इथे आत्मिक समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी