शिक्षकांविषयी अवमानकारक भाषा खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:00+5:302021-03-05T04:22:00+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात समन्वय समितीने म्हटले आहे, शिक्षकांविषयी कायम अवमानकारक भाषा ...

Will not tolerate abusive language about teachers | शिक्षकांविषयी अवमानकारक भाषा खपवून घेणार नाही

शिक्षकांविषयी अवमानकारक भाषा खपवून घेणार नाही

Next

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात समन्वय समितीने म्हटले आहे, शिक्षकांविषयी कायम अवमानकारक भाषा वापरणाऱ्या या सदस्यास समज द्यावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. राज्यात कुठल्याच जिल्हा परिषदेत घडत नाहीत अशा बाबी समोर आणून फक्त आपल्याच जिल्ह्यात शिक्षकांचा जाहीर अवमान केला जातो. विद्यार्थी व गुणवत्तेसाठी प्रशासन अथवा पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली धोरणे आम्ही राबवतो. शिक्षक ऐकतात याचा अर्थ प्रत्येक सभेत त्यांचा अवमान करण्याचा हक्क कुणाला मिळालेला नाही. घरभाड्याचा प्रश्न राज्य सरकारशी संबंधित आहे. त्याचा कायदेशीर निर्णय असेल तो घेण्यास आमची हरकत नाही; पण कोविड योद्धा म्हणून काम केलेल्या शिक्षकांनी घरभाडे लाटले असा शब्दप्रयोग वापरून या सदस्यांनी शिक्षकांविषयी असलेल्या असूयेचे दर्शन घडविले आहे. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ३० टक्के कपात करण्याच्या ठरावाचे आम्ही स्वागत करतो. याची अंमलबाजवणी करताना तक्रार आलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची सर्व बाजूने बारकाईने चौकशी करावी. ज्याला वेतन आहे त्याला नियम लावता येईल; परंतु इतरांनीही ही नैतिकता बाळगावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर डॉ. संजय कळमकर, आबासाहेब जगताप, रा. या. औटी, राजेंद्र शिंदे, प्रवीण ठुबे, संजय धामणे, आबा लोंढे, राजू रहाणे, विकास डावखरे, जावेद सय्यद, राजेंद्र ठोकळ, एकनाथ व्यवहारे, रहेमान शेख, बाळासाहेब सालके, विजय महामुनी, दादा वाघ, मधुकर मैड, विजय जाधव, प्रताप पवार, मधुकर रसाळ, विजय लंके, बाळासाहेब देंडगे, चंद्रकांत शिंदे, कैलास ठाणगे, नाना गाढवे, शिवाजी काकडे, शैलेश खणकर, शिवाजी औटी, संदीप भालेराव, भगवान बोरुडे, अरविंद थोरात, राजेंद्र ठुबे, नंदू धामणे, प्रमोद झावरे, अविनाश गांगर्डे, सुनील नरसाळे, नवनीत लोंढे, दत्ता जाधव, बाबा धरम, योगेश शिंदे, किशोर राठोड, पोपट तूपसौंदर, शहाराम येरकळ आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Will not tolerate abusive language about teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.