अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात काय सुरू राहणार, वाचा....1

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 12:39 PM2020-05-04T12:39:38+5:302020-05-04T12:41:49+5:30

अहमदनगर: कन्टेमेंट झोन वगळता जिल्हाप्रशासनाकडून सर्व दुकाने सुरू सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी मुभा देण्यात आली आहे़ मात्र मुलत्वांचे पालन करणे बंधनकारक असून, एकल दुकानेच फक्त सुरू करता येणार असल्याचे  प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत़ जिल्ह्यात काय सुरू राहणार आणि कशावर बंदी हे पुढीलप्रमाणे आहे़.

What will continue during the lockdown, read .... | अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात काय सुरू राहणार, वाचा....1

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात काय सुरू राहणार, वाचा....1

Next

अहमदनगर: कन्टेमेंट झोन वगळता जिल्हाप्रशासनाकडून सर्व दुकाने सुरू सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी मुभा देण्यात आली आहे़ मात्र मुलत्वांचे पालन करणे बंधनकारक असून, एकल दुकानेच फक्त सुरू करता येणार असल्याचे  प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत़ जिल्ह्यात काय सुरू राहणार आणि कशावर बंदी हे पुढीलप्रमाणे आहे़.


काय बंद राहणार 
- रेल्वे प्रवाशी वाहतूक 
-अंतराज्य बससेवा
 -वैद्यकीय कारण अथवा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या व्यतिरिक्त आंतरराज्य वैयक्तिक प्रवास
-शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आदी
-शॉपिंमॉल, सिनेमागृह, व्यायामशाळा, धार्मिक कार्यक्रम, 
- सर्व प्रकारचे धार्मिक, प्रार्थनास्थळे 
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर संध्याकाळी ७ ते सकाळी ७ यावेळेत निर्बंध राहतील
- ६५ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती, गर्भवती  महिला व १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहिल़
-हॉटस्पॉटमध्ये मेडीकल क्लिनिक व ओपीडी सुरू करण्यास बंदी राहिल
- सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील़
़़़़़
हे सुरू राहिल
कृषी
-शेतीमाल खरेदी विक्री, बााजार समित्या
-कृषी उपकरणे, यंत्रे बनविणारे दुकाने व कारखाने
-शेतीमाल वाहतूक व विक्री बियाणे, खते किटकनाशकांची विक्री सुरू राहिल
़़़
आस्थापना
- शासकीय कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार ३३ टक्केपर्यंत उपस्थिती राहिल
-इलेक्ट्रॉनिक माध्यमे , माहिती तंत्रज्ञान व त्यावर आधारीत सेवा सुरू राहतील
-कोल्ड स्ट्रोरेज, वेअर हाऊसेस, खाजगी सुरक्षा सेवा, इमारतींच देखभालीकरिता, सहाय्यभूत ठरणार व्यवस्थापन सुविधा सुरू राहतील
-महापालिका नगरपालिका हद्दीतील बाजारपेठा व बाजार संकुलात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने सुरू राहतील
-महापालिका नगरपालिका हद्दीतील एकल वसाहतीतील लगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरू राहतील़ तथापि आशा भागात एखाद्या गल्लीत रस्त्यालगत ५ पेक्षा अधिक दुकाने असल्यास अशा दुकानांपैकी जीनावश्यक वस्तूूंची विक्री करणारीच दुकाने सुरू राहितील़
-ग्रामीण भागात मॉल वगळता सर्व दुकाने सुरू राहतील
- दुकानासमोर गर्दी दिसल्यास दुकान सील केले जाईल
़़
सार्वजनिक सुविधा
- डिझेल विक्री २४ तास
- पेट्रोल विक्री सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत
- दुष्काळ टंचाई निवारणाची कामे सुरू राहितील
-शासकीय निमशासकीय कार्यालये सुरू राहतील
- अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त १० व्यक्तींनाच परवानगी
-प्रसार माध्यमांचे कार्यालये सुरू राहतील
-चिक्स, चिकण, आंडी, दुकाने सुरू राहतील
-पशूवैद्यकीय दवाखाने, औषाधालये
़़़़
वाहतूक
- सर्व वस्तू व मालाची वाहतूक करता येईल़ रेल्वेव्दारे वस्तू माल पार्सल यांची ने आण करता येईल
- सर्वप्रकारचे वस्तू व माल वाहतूक करणारा ट्रक व तसम वाहने हे वाहतूक करताना दोन चालक एक हेल्पर यांच्या सोबत वाहतूक करतील़ तसेच माल वस्तू पोहोच केल्यानंतर रिकाम्या झालेल्या वाहनांनादेखील वाहतूकीसाठी परवानगी असेल़
- ट्रक व तसम व माल वाहतूक करणाºया वाहनाची दूरुस्ती करणारी दुकाने सुरू राहतील, तथापि संबंधितांना केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे़
- रेल्वे वाहतूकीच्या ठिकाणी कामावर जाणारे अधिकारी व कर्मचारी कंत्राटी कामगार यांना संबंधित अस्थापना यांनी दिलेल्या अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगूनच कामावर हजर राहता येईल़
- अत्यावाश्यक सेवांकरिता चारचाकी वाहनांमध्ये केवळ वाहन चालक व इतर दोन व्यक्ती यांना परवानगी राहील़ तसेच दुचाकी वाहनांकरिता केवळ वाहन चालका यांनाच परवानगी राहिल़
़़़
उद्योग 
-ग्रामीण भागात सामाजिक अंतर ठेऊन उद्योग सुरू करता येतील

Web Title: What will continue during the lockdown, read ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.