संचारबंदीचे उल्लंघन : पोलिसावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 06:41 PM2020-04-11T18:41:30+5:302020-04-11T18:45:04+5:30

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असताना विनाकारण फिरताना व तोंडाला मास्क न लावल्याच्या कारणामुळे राज्य राखीव दलातील एका पोलिसावर राशीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Violation of communications barrier: Police register crime | संचारबंदीचे उल्लंघन : पोलिसावर गुन्हा दाखल

संचारबंदीचे उल्लंघन : पोलिसावर गुन्हा दाखल

googlenewsNext

राशीन : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असताना विनाकारण फिरताना व तोंडाला मास्क न लावल्याच्या कारणामुळे राज्य राखीव दलातील एका पोलिसावर राशीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल तात्या रोकडे ( ब.क.नंबर ९८४, दौंड गट नं-७, जि.पुणे, राज्य राखीव पोलीस) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त राशीन पोलीसांनी चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान राशीन-भिगवण रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे चौकात कारवाई करण्यात आली. गणेश ठोंबरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नाकेबंदी चालू असताना विनाकारण फिरताना व तोंडाला मास्क न लावल्याच्या अवस्थेत आढळ्याने राशीन येथील पुष्पक शितलकुमार दोभाडा (वय ३०), विक्रम शितलकुमार दोभाडा (वय२९),  संपत म्हलारराव मोरे (वय ४०), रा. खेड ता. कर्जत व बाजीराव दादा शेटे (वय ३५) रा.खेड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Violation of communications barrier: Police register crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.