शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

शाळेला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 6:06 PM

कोतूळ : अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या नमुनेदार घटना समोर येत असताना तालुक्यातील एका नमुनेदार शिक्षकाच्या करामतीचे पाढे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थांसमोर वाचले. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागात तक्रार करूनही कारवाई न झाल्याने मंगळवारी सकाळी दहा वाजता सर्व ग्रामस्थांनी एल्गार पुकारत शाळेला टाळे ठोकले. प्राथमिक ...

ठळक मुद्देगावाचा एल्गारग्रामस्थांच्या व जिल्हा परिषद सदस्याच्या मागणीला केराची टोपली
कोतूळ : अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या नमुनेदार घटना समोर येत असताना तालुक्यातील एका नमुनेदार शिक्षकाच्या करामतीचे पाढे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थांसमोर वाचले. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागात तक्रार करूनही कारवाई न झाल्याने मंगळवारी सकाळी दहा वाजता सर्व ग्रामस्थांनी एल्गार पुकारत शाळेला टाळे ठोकले.प्राथमिक शिक्षण विभागाचा गोंधळ दुर्गम भागासाठी मात्र शाप ठरत आहे. चक्क ग्रामस्थ विद्यार्थी व जिल्हा परिषद सदस्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याने या विभागावर विद्यार्थ्यांनी विश्वास कसा ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोतूळपासून २२ किलोमीटर अंतरावरील दुर्गम आदिवासी भागातील केळी बांगरवाडी या दोन शिक्षकी शाळेतील बाबूराव वसंत देशमुख नावाचे शिक्षक गेल्या वर्षभरापासून सतत गैरहजर होते. शिवाय ते कधीतरी शाळेत आले तर त्यांची ‘ ती ’ अवस्था पाहून विद्यार्थी वगार्तून पळ काढत होते. मात्र हे ‘ गुरू ’ नको म्हणून ग्रामस्थांनी गेल्या दीड वर्षीपासून शिक्षण विभागाचे उंबरे झिजविले. जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे यांच्याकडे तक्रार केली. मात्र शिक्षण विभागाने पुन्हा त्याच शिक्षकास त्याच शाळेवर पाठविण्याचा घाट घातल्याने व नविन शिक्षक न दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी शाळेला टाळे ठोकले. यावेळी सरपंच मंगल धराडे, उपसरपंच भीमा गोडे, सदस्य दारकू भवारी, अंजना बांगर, सखुबाई गोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गोडे, मारुती गोडे, शंकर गोडे , लक्ष्मण बांगर, सचिन बांगर, शंकर कडू , शंकर तळपे , बापू लांडगे, बाळू वैराळ , कमलेश वाघमारे, पुनाजी गोडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...................................फोटो २२ शाळेला कुलूपओळ: केळी बांगरवाडी (ता.अकोले) येथील शिक्षकाच्या बदलीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले.