शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

व्हॅलेंटाईनचा गुलाब निघाला प्रेमिकांच्या भेटीला; प्लास्टीक गुलाबाचा परिणाम, विक्रीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 4:13 PM

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर लांब दांडीच्या गुलाब पुष्पांची काढणी अंतिम टप्प्यात आहे़ व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमिकांच्या हाती जाण्यासाठी व अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी हा गुलाब बाजारपेठेकडे झेपावला आहे़

प्रमोद आहेर ।  शिर्डी : व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर लांब दांडीच्या गुलाब पुष्पांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमिकांच्या हाती जाण्यासाठी व अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी हा गुलाब बाजारपेठेकडे झेपावला आहे.शिर्डीलगत असलेल्या निमगाव येथील अमोल चांगदेव गाडेकर हे पॉली हाऊसमध्ये लांब दांडीच्या गुलाबाची शेती करतात. शिर्डी व परिसरात हार बनवण्यासाठी लागणारा डिव्हाईन जातीचा गुलाब पिकवला जातो. गाडेकर मात्र व्हॅलेंटाईन डे किंवा एरवी बुके व डेकोरेशनसाठी वापरण्यात येणारा टॉप सिक्रेट जातीचा गुलाब लावतात. त्यात ते रेड, पिंक व व्हाईट पिंक रंगाचे नयन मनोहर गुलाब फुलवतात. व्हॅलेंटाईन डेसाठी डिसेंबरमध्ये गुलाबाची छाटणी केली जाते. त्यानंतर खत, पाणी व औषध फवारणी असते, एकापेक्षा अधिक आलेल्या कळ्या खुडून टाकाव्या लागतात. एका दांडीला आलेल्या तीन-चार कळ्या खोडून एकच गुलाब जोपासला जातो. जेवढी गुलाबाची दांडी लांब तेवढा भाव अधिक मिळतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर गुलाब काढायला सुरूवात केली जाते. डिसेंबरमध्ये पुरेशी थंडी नसली तरी गुलाब लवकर काढणीवर येतो. अशावेळी प्रत्येक गुलाबाला जाळीची कॅप घालून उमलण्यास रोखले जाते. शिर्डी व परिसरात सर्रास पिकवला जाणारा डिव्हाईन गुलाब सध्या साठ रूपये शेकडा आहे. मात्र अमोल गाडेकर यांच्या शेतातील गुलाब साडेसात रूपयांना एक विकला जातो. एका बंडलमध्ये वीस गुलाब असतात़ एक बंडल दीडशे ते साडे तीनशे रूपयांपर्यंतही विकला जातो. हाच गुलाब बाजारात आकर्षक रूप देऊन वीस रूपये ते शंभर रूपये नगाने विकला जातो. व्हॅलेंटाईनला या लांब दांडीच्या गुलाबाला खूप मागणी असते़ अमोल हे शिर्डीबरोबर दिल्ली, मुंबई, भोपाळ अशा देशातील विविध शहरांमध्ये आपले गुलाब पाठवितात. यंदा ते जवळपास चाळीस हजार गुलाब व्हॅलेंटाईनला बाजारात पाठवत आहेत. फुलांची काढणी सध्या जोरात सुरू आहे.

बाजारात आता आकर्षक प्लास्टीकचे गुलाब आल्याने ओरिजनल गुलाब शेतीला त्याचा चाळीस टक्के फटका बसला आहे़ त्यातच डावणीचा रोग पडतो. यंदा जास्त पावसाने उत्पादन व दर्जा घटला, असे राहाता तालुक्यातील निमगाव येथील गुलाब पुष्प उत्पादक अमोल गाडेकर यांनी सांगितले.      

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे