शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 12:38 PM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास साडेपाच लाख शेतकऱ्यांनी 3 लाख 59 हजार 992 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे.

गोरख देवकरअहमदनगर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास साडेपाच लाख शेतकऱ्यांनी 3 लाख 59 हजार 992 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचा विमा उतरविला आहे. तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविली होती. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दीडपट अधिक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे.प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास 5 लाख 68 हजार 375 शेतक-यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीक विमा उतरविला आहे. विमाहप्त्यापोटी 22 कोटी 82 लाख रूपये भरले आहेत. गतवर्षी साडेतीन लाख शेतक-यांनी पीक विमा भरला होता़ त्या तुलनेत यंदा शेतक-यांची दीडपट अधिक संख्या आहे.जिल्ह्यात यंदा भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोटात पाऊस आहे. मात्र लाभक्षेत्रात पावसाने दांडी मारली आहे. बहुतांश भागात पेरलेले अद्यापपर्यंत उगवलेले नाही.2014-151 लाख 40 हजार 154 शेतक-यांनी 3 कोटी 92 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. त्यांना 22.07 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.2015-163 लाख 77 हजार 217 शेतक-यांनी 10 कोटी 57 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. शेतक-यांना 120.62 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.2016-174 लाख 29 हजार 150 शेतक-यांनी 21 कोटी 53 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. शेतक-यांना 83.23 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.2017-182 लाख 52 हजार 896 शेतक-यांनी 22 कोटी 4 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. केवळ 20.87 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.2018-197 लाख 65 हजार 505 शेतक-यांनी 47 कोटी 9 लाख रूपये विमा हप्ता भरला होता. शेतक-यांना 90.79 कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतक-यांना विमा संरक्षण मिळणार.24 जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम मुदत होती. पण, यासाठी येणा-या तांत्रिक अडचणी, पोर्टलमध्ये वारंवार उद्भवणा-या त्रुटी आणि बँकानी पीक विमा भरून घेण्यास होत असलेला विलंब यामुळे सेतु सुविधा केंद्रावर होणारी शेतक-यांची गर्दी लक्षात घेऊन 31 जुलैपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली.विमा हप्ता किती?खरीप हंगामातील पिकांसाठी शेतक-यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के तर नगदी पिकांकरिता 5 टक्के हप्ता शेतक-यांना भरावा लागणार आहे.5.68 लाख शेतक-यांनी यंदा जिल्ह्यातील 3 लाख 59 हजार 692 हेक्टरवरील विविध पिकांचा विमा उतरविला

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय